Sarsenapati Hambirrao Movie : ‘महाराजांचं स्वराज्य अठरा पगड जातीजमातींनी मिळून उभं केलं.. हिंदवी स्वराज्यासाठी जो मरणासमोर हटून उभा राहिला तो मरहट्टा.. वीर मराठा..’ अशी गर्जना ऐकून आली आणि प्रेक्षकांमध्ये ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) या ऐतिहासिक चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली. प्रेक्षक हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत होते. आता त्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. लेखक-दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarde) यांनी या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे.
प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट येत्या 27 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रविण तरडे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
पाहा पोस्ट :
‘बाहुबली’नेही केलेय कौतुक!
या चित्रपटाच्या टीझरला ‘बाहुबली’कडून कौतुकाची थाप मिळाली होती. ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास याने प्रविण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या टीझरचे जाहीर कौतुक केले होते. प्रभासने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित चित्रपटाचे कौतुक केले. ‘बाहुबली’ला देखील या चित्रपटची उत्सुकता आहे.
गश्मिर महाजनी साकारणार महाराजांची भूमिका!
प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ मध्ये कोणते कलाकार, कोणती ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसते आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर यातील एका महत्वपूर्ण व्यक्तिरेखेचा ‘चेहरा’ समोर आला होता. मराठीतील हॅंड्सम हंक अभिनेता गश्मीर महाजनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, स्वतः प्रविण तरडे हे ‘सरसेनापती हंबीरराव’ साकारणार आहेत.
हेही वाचा :
- Kangana Ranaut On The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' सिनेमावर 'पंगा क्वीन'ने दिली प्रतिक्रिया, म्हणाली...
- Jui Gadkari : जुई गडकरीची पोस्ट चर्चेत; गंभीर आजाराबद्दल दिली माहिती
- Jhund: झुंड पाहिल्यानंतर आमिरनं दिलेल्या रिअॅक्शवर बिग बींची प्रतिक्रिया; म्हणाले 'तो...'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha