Samayra Marathi Movie : अभिनेत्ते-दिग्दर्शक ऋषी कृष्ण देशपांडे दिग्दर्शित 'समायरा' (Samayra) हा चित्रपट येत्या 26 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'समायरा'च्या प्रवासाची ही कहाणी सर्वांपर्यंत पोहचावी, म्हणून चित्रपटाचे जोरदार प्रोमोशन चालू आहे. याच चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी पुण्यात बाईक रॅली काढण्यात आली होती. अभिनेत्री केतकी नारायण तिच्या या आगामी चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अव्हेंजर बाईक चालवताना दिसते आहे. स्वतंत्र, सकारात्मक दृष्टिकोन असलेली 'समायरा' स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात निघालेल्या प्रवासाची ही कथा आहे. नुकतीच केतकीने पुण्यात सर्व महिलांबरोबर बाईक चालवली. या बाईक रॅलीत पुण्यातील बऱ्याच महिलांचा सहभाग होता.


याबद्दल बोलताना अभिनेत्री केतकी नारायण म्हणाली की, ‘समायरा' ही एक सोलो ट्रिपवर असलेल्या मुलीची कथा आहे. सगळ्याच महिला आपापल्या आयुष्यात फायटर असतात. सर्व जबाबदाऱ्या त्या अगदी चोखपणे पार पडतात व आपल्यासोबत आपल्या परिवाराला ही पुढे घेऊन जातात. आजच्या या बाईक रॅलीत मी या सर्व स्ट्राँग महिलांबरोबर माझे 'समायरा' हे निर्भीड पात्र प्रेक्षकांच्या समोर सादर केले आहे. माझ्यासोबतच पुण्यातील महिलांनीही या बाईक रॅलीचा आनंद लुटला आहे.



उत्कंठावर्धक ट्रेलर


नुकताच ‘समायरा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आई-वडिलांच्या शोधात निघालेली 'समायरा' कशी स्वतःच स्वतःला उलगडतेय आणि तिच्या आयुष्याचे काही काळाच्या आड दडून राहिलेले रहस्य कसे हळूहळू समोर येतात, हे या ट्रेलरमधून कळत आहे. आजच्या नव्या पिढीला अध्यात्माचे महत्व हा चित्रपट घडवून देईल, असे ट्रेलर पाहून वाटत आहे. 'समायरा'चे आणि तिच्या साथीदाराचे हळुवार उलगडत जाणार नाते नक्कीच प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.


प्रेक्षकांना सकारात्मकता देईल!


‘समायरा’चे दिग्दर्शक ऋषी देशपांडे म्हणतात की, ‘प्रत्येक जण आयुष्य जगण्यासाठी एक प्रवास करत असतो. तसाच एक असाधारण प्रवास ‘समायरा’चाही असणार आहे. तिचा हा प्रवास तिचे ध्येय साध्य करणार का, हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवनवीन विषय हाताळले जात आहेत. ही कथाही खूप वेगळी आहे. ‘समायरा’चा हा प्रवास प्रेक्षकांना नक्कीच सकारात्मकता देईल.’


ग्लोबल सेवा एलएलपी प्रस्तुत, आद्योत फिल्म्सच्या सहयोगाने, 'समायरा'ची निर्मिती डॉ. जगन्नाथ सुरपूरे, रतन सुरपूरे, शशिकांत पानट, योगेश आळंदकर आणि ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केली आहे. तसेच या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबे यांचे आहेत.


संबंधित बातम्या


Samaira : 'समायरा'तील 'आला रे हरी आला रे' अभंग प्रेक्षकांच्या भेटीला; 26 ऑगस्टला सिनेमा होणार प्रदर्शित



Entertainment News Live Updates 23 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!