Bharat Jodo Yatra : काँग्रेसच्या वतीनं 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) काढण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. सोमवारी रात्री देखील काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली आहे. या बैठकीत भारत जोडो यात्रेसंदर्भात विविध मुद्यांवर चर्चा झाली. येत्या सात सप्टेंबरपासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु होणार आहे. ही यात्रा 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे.


दरम्यान, आज दुपारी 12 वाजता काँग्रेसची नवी दिल्लीत पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये भारत जोडो यात्रेच्या लोगोचं अनावरण होण्याची शक्यता आहे. तसेच भारत जोडे यात्रेच्या संदर्भात पुढची दिशा काय असणार याची माहिती देण्यात येणार आहे. ही पत्रकार परिषद काँग्रेसचे वरिष्ठ नेते घेणार आहेत. 
  
देशातील जनतेला जोडण्याचं राजकारण हवं


आज दुपारी 12 वाजता काँग्रसचे वरिष्ठ नेते पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये भारत जोडो यात्रेच्या संदर्भात महत्वाची माहिती देण्यात येणार आहे.  काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे. भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये देशभरातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यावेळी 'स्वराज इंडिया'चे योगेंद्र यादव आणि इतर अनेक सामाजिक आणि गैर-सरकारी संस्थांचे सदस्य देखील या बैठकीला उपस्थित होते. या यात्रेच्या माध्यमातून जोडण्याचे राजकारण करायचे असल्याचे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत कोणी सहभागी होऊ अथवा न होऊ  ते यात्रा पूर्ण करणार आहेत. दरम्यान, देशातील जनतेत फूट पाडण्याचे राजकारण मला नको आहे, जोडण्याचे राजकारण हवे असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. 


भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबरपासून सुरू होणार 


काँग्रेसच्या वतीनं 'भारत जोडो यात्रा' काढण्यात येणार आहे. या यात्रेचा शुभारंभ 7 सप्टेंबरपासून होमार आहे.  या यात्रेतची सुरुवात तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून होणार आहे. हा प्रवास 3 हजार 500 किमी अंतर कापून काश्मीरमध्ये संपेल. काँग्रेसच्या मते या यात्रेत सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि समविचारी लोक सहभागी होऊ शकतात.


महत्त्वाच्या बातम्या: