Sonali Phogat : भाजप नेत्या आणि सोशल मीडिया स्टार सोनाली फोगाट (Sonali Phogat) हत्याप्रकरणाचा तापास सध्या गोवा पोलीस करत आहेत. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात होती. आता सोनाली फोगाट हत्याप्रकरणाची संपूर्ण माहिती असणारे कागदपत्र अंजुना पोलिस स्टेशनचे पीआय प्रशल देसाई यांनी तयार केले आहे. जर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला तर गोवा पोलीस या प्रकरणाच्या तपासाचा प्रत्येक तपशील सीबीआयकडे सोपवतील. या कागदपत्रामध्ये तपासादरम्यान सापडलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल या गोष्टींची नोंद करण्यात आली आहे. 


काय म्हणाले गोव्याचे मुख्यमंत्री? 
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं की, 'सोनाली फोगाट यांच्या हत्याप्रकणात आतापर्यंत पाच लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडून सीबीआय तपासणीची मागणी करण्यात आली आहे. गरज पडली तर सीबीआयकडे ही केस सोपवण्यात येईल'


अंजुना पोलिस स्टेशनचे पीआय देसाई यांनी या कागदपत्रामध्ये लिहिले आहे की, तपासात करत असताना अटक करण्यात आलेला आरोपी सुधीर सांगवाने आपला गुन्हा कबूल केला. सुधीरने सांगितले की, लिओनी हॉटेलचा वेटर बॉय असलेल्या ड्रग पॅडलरकडून त्याने एमडी ड्रग विकत घेतले. या वेटरचे नाव दत्त प्रसाद गावकर असून त्याने दत्त प्रसादला एमडी ड्रगसाठी 7 हजार दिले. तसेच त्याने दत्त प्रसादला 5 हजार देखील दिले होते. असे एकूण 12 हजार सुधीरने दत्त प्रसाद गावकरला दिले. 


अंजुना पोलिस स्टेशनचे पीआय देसाई यांनी तयार केलेल्या या आठ पानांच्या कागदपत्रामध्ये लिहिण्यात आलं आहे की,  गोवा पोलीस हे सुधीरसोबत फॉरेन्सिक टीमसह कर्लीज क्लबमध्ये गेला, तेथील डान्स फ्लोअरची, टॉयलेटची पाहणी केली. तेथे त्यांना बाटलीत लपवलेले औषध सापडले. सुधीरच्या सर्व जबाबाची पुष्टी देखील करण्यात आली. या प्ररणातील आरोपी सुखविंदरने देखील सांगितलं की सुधीर खरं बोलत आहे.  सुधीर सांगवान व्यतिरिक्त कथित ड्रग्ज तस्कर आणि गोव्यातील कर्लीज रेस्टॉरंटचा मालक देखील पोलिसांच्या ताब्यात आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: