Virat Kohli Anushka Sharma: भारतातील मोस्ट फेवरेट कपल्सपैकी एक असणारे विराट कोहली (Virat Kohali) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या प्रत्येक हालचालींवर सर्वांचं लक्ष असतं. दोघांची साधी डिनर डेट असो, वा त्यांचं एकादं व्हेकेशन या या पॉवर कपलच्या अॅक्टिव्हिटी नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. सध्या हे पॉवर कपल लंडनला शिफ्ट होण्याच्या तयारीत (Why Virat And Anushka Are Considering Shifting To London?) असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा विरुष्कावर (Virushka) खिळल्या आहेत. दोघांनाही दोन गोंडस मुलं आहेत. त्यांची नावं, वामिका आणि अकाय. आपल्या दोन्ही मुलांसह अनुष्का आणि विराट लंडनला शिफ्ट होणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता यावर माधुरी दीक्षितचे (Madhuri Dixit) पती डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) यांनी खुलासा केला आहे. विराट-अनुष्काला लंडनला का शिफ्ट व्हायचंय? (Why Do Virat-Anushka Want To Shift To London?) याचं कारणंच डॉ. नेनेंनी सांगितलं आहे.
अनुष्कानं लंडनमध्ये दिलेला मुलाला जन्म
गेल्या वर्षी अनुष्कानं तिच्या मुलाला जन्म दिला आणि तेव्हापासून विरुष्का आता आपल्या दोन्ही मुलांसह लंडनला शिफ्ट होणार असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. अलिकडेच, विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला होता, तेव्हाही याबाबत जोरदार चर्चा रंगली होती. अशातच आता दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी विराट-अनुष्काच्या लंडनला जाण्याच्या निर्णयामागील कारण उघड करून पुन्हा एकचा चर्चांना हवा दिली आहे.
विरूष्का लंडनला का शिफ्ट होणार?
युट्यूबर रणवीर इलाहाबादिया याच्या पॉडकास्टसाठी डॉ. श्रीराम नेने उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी विराट-अनुष्का लंडनला शिफ्ट होण्याचा विचार का करत आहेत? याबाबत खुलासा केला. डॉ. नेने म्हणाले की, त्यांना विराट कोहलीबद्दल खूप आदर आहे आणि तो खरंच एक जेंटलमन आहे.
याशिवाय डॉ. नेने यांनी यावेळी बोलताना अनुष्का शर्मासोबत झालेल्या संभाषणाबाबत सांगितलं. डॉ. नेने म्हणाले की, विराट-अनुष्काला त्यांच्या मुलांना अत्यंत सर्वसाधारणपणे वाढवायचं आहे. त्यामुळेच त्यांना लंडनला जायचं आहे. डॉ. श्रीराम नेने म्हणाले की, "ते लंडनला जाण्याचा विचार करत होते, कारण त्यांना इथे मिळालेल्या यशाचा आनंद घेता येत नाही. मी त्यांच्या कठोर परिश्रमाचं कौतुक करतो, कारण ते जे काही करतात ते लोकांचं लक्ष वेधून घेतं. अनुष्का आणि विराट हे खरंच खूप प्रेमळ लोक आहेत आणि त्यांना त्यांच्या मुलांना सामान्य पद्धतीनं वाढवायचं आहे."
दरम्यान, स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यापैकी कुणीच लंडनला जाण्याबाबत काहीच बोललेलं नाही. विराट सध्या आयपीएलमध्ये व्यक्त आहे. तर, अनुष्काही तिच्या काही प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहे. दरम्यान, दोघांनाही आपल्या मुलांना लाईमलाईटपासून दूर ठेवायचं आहे. दोघांनीही पॅपाराझींना वामिका आणि अकायचे फोटो न काढण्याची विनंती केली आहे. सोशल मीडियावरही अजुनपर्यंत त्यांनी आपल्या मुलांचे चेहरे दाखवलेले नाहीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :