Jaat Box Office Collection Day 19: सनी देओलच्या (Sunny Deol) 'जाट'ची (Jaat Movie) क्रेझ अजूनही संपलेली नाही. साऊथमध्ये धुमाकूळ घालणारा Thudarum 'जाट'चं अस्तित्व संपवेल असं वाटत होतं. पण, 'जाट'नं वेळीच बाजी पलटवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रचंड कमाई करणाऱ्या Thudarum या मोठ्या साऊथ फिल्मच्या कमाईत 19 व्या दिवशी कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळालं. तर, आता बॉक्स ऑफिसवरुन (Box Office) आपला गाशा गुंडाळेल असं वाटणाऱ्या 'जाट'नं दमदार कमाई केली आहे. 

10 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या सनी पाजीच्या चित्रपटाच्या 19 व्या दिवसाच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. जाणून घेऊया की, या चित्रपटानं आतापर्यंत किती कमाई केली आहे आणि कमाईच्या बाबतीत 'जाट'नं कोणत्या दाक्षिणात्य सुपरस्टारला मागे टाकले आहे, याबाबत सविस्तर... 

'जाट' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

खाली दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्ही 'जाट'ची प्रत्येक दिवसाची कमाई स्वतंत्रपणे पाहू शकता. यामध्ये दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, 15 दिवसांचं कलेक्शन (81.75 कोटी रुपये) आणि सॅक्निल्कनुसार उर्वरित 4 दिवसांच्या कलेक्शनचा समावेश आहे. आजच्या म्हणजेच, 19 व्या दिवसाच्या कमाईशी संबंधित डेटा सकाळी 10:10 वाजेपर्यंतचा आहे आणि तो अंतिम नाही. यामध्ये बदल होऊ शकतात.

दिवस बॉक्स ऑफिस कलेक्शन (कोट्यवधींमध्ये)
Jaat Box Office Collection Day 1 9.62
Jaat Box Office Collection Day 2 7
Jaat Box Office Collection Day 3 9.95
Jaat Box Office Collection Day 4 14.05
Jaat Box Office Collection Day 5 7.30
Jaat Box Office Collection Day 6 6
Jaat Box Office Collection Day 7 4.05
Jaat Box Office Collection Day 8 4.27
Jaat Box Office Collection Day 9 3.95
Jaat Box Office Collection Day 10 3.90
Jaat Box Office Collection Day 11 5.09
Jaat Box Office Collection Day 12 1.80
Jaat Box Office Collection Day 13 1.93
Jaat Box Office Collection Day 14 1.46
Jaat Box Office Collection Day 15 1.38
Jaat Box Office Collection Day 16 0.85
Jaat Box Office Collection Day 17 1.30
Jaat Box Office Collection Day 18 1.96
Jaat Box Office Collection Day 19 0.54
Jaat Total Box Office Collection 86.41

एकाच वेळी प्रदर्शित झालेल्या 'गुड बॅड अग्ली!'ला 'जाट'नं पछाडलं

'जाट' आणि 'गुड बॅड अग्ली' या दोन्ही चित्रपटांचे निर्माते एकच आहेत. मैथ्री मूव्ही मेकर्सनं अजित कुमारचा तमिळ चित्रपट 'गुड बॅड अग्ली' आणि हिंदी चित्रपट 'जाट' एकाच दिवशी प्रदर्शित केले आहेत. पहिल्या दिवशी 'गुड बॅड अग्ली'नं 29.25 कोटी रुपयांची ओपनिंग केली होती, तर 'जाट'नं 9.62 कोटी रुपयांची कमाई केली होती. या साऊथ चित्रपटाचं बजेटही जास्त होतं आणि ते सुमारे 200 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आलं होतं. 

अजित कुमारच्या चित्रपटानं 19 व्या दिवशी फक्त 51 लाखांची कमाई केली आहे, तर 'जाट'नं त्याला आधीच मागे टाकलं आहे. 'जाट'चं बजेटही तमिळ चित्रपटाच्या निम्मं आहे. फक्त 100 कोटींमध्ये बनवलेल्या 'जाट'ला त्याचं बजेट वसूल करण्यासाठी फक्त 14 कोटी रुपये अधिक कमवावे लागतील, तर सॅक्निल्कच्या मते, 'गुड बॅड अग्ली'नं आतापर्यंत फक्त 151 कोटी रुपये कमावले आहेत. याचाच अर्थ असा की, त्यांना त्यांचं बजेट वसूल करण्यासाठी 49 कोटी रुपये अधिक कमवावे लागतील.

कालच्या तिसऱ्या रविवारी झालेल्या कमाईतही, 'जाट', 'गुड बॅड अग्ली' पेक्षा थोडा मागे होता. या दाक्षिणात्य चित्रपटानं 2.04 कोटी रुपये कमावले, तर 'जाट'नं 1.96 कोटी रुपये कमावले. याचा अर्थ असा की, प्रत्येक बाबतीत, 'जाट' आता तमिळ स्टार अजित कुमारवर मात करताना दिसत आहे.

दरम्यान, 'जाट'चं दिग्दर्शन साऊथचे दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी यांनी केलं आहे. या चित्रपटात सनी देओलसोबत रणदीप हुड्डा आणि विनीत कुमार सिंह झळकले आहेत. तर रम्या कृष्णन, जगपती बाबू, रेजिना कॅसांड्रा आणि सैयामी खेर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Vijay Deverakonda On Chhaava Movie: 'मला औरंगजेबाला दोन-तीन कानफाटात मारायच्यात...'; प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत