Kareena Kapoor Trolled: कश्मिर खोऱ्यातल्या पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) झाल्यानंतर भारतात पाकिस्तानी चित्रपटांवर बंदी (Pakistani Films Banned in India) घालण्यात आली आहे. यासोबतच भारतीय चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. अशातच, बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) करीना कपूरचे (Kareena Kapoor Khan) पाकिस्तानी डिझायनर (Pakistani Designer) फराज मन्नानसोबतचे (Faraz Mannan) फोटो व्हायरल (Photo Viral) होत आहेत. हे पाहून भारतीय चाहते संतापले आहेत आणि अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत. तसेच, अनेकांनी करिनासह सर्वच बॉलिवूड कलाकारांचा देशद्रोही असा उल्लेख केला आहे.
बॉलिवूडची बेबो म्हणजेच, करिना कपूर खान नुकत्याच एका कार्यक्रमासाठी दुबईला गेली होती. यावेळी तिची भेट पाकिस्तानातील प्रसिद्ध डिझायनर फराज मन्नानशी झाली. यावेळी दोघांनी एकत्र पोजसुद्धा दिल्या. फराजनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर करीनासोबतचे फोटो शेअर केले. दोघांचा एकत्र काढलेला फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. फॅशन डिझायनर फराजनं पहिल्या फोटोसोबत कॅप्शनही दिलं आहे. त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'ओजी करीना कपूरसोबत...'
करीनानं फराजसोबत दिली पोज
दुसऱ्या फोटोमध्ये, करिना कपूर फराज मन्नानच्या खांद्यावर हात ठेवून पोज देताना दिसत होती. यावेळी दोघांसोबत इतरही काहीजण दिसले. फोटोमध्ये करिना पांढऱ्या रंगाच्या कॉर्सेटमध्ये दिसत होती, तर फराज काळ्या रंगाच्या टी-शर्ट आणि पँटमध्ये दिसत होता. आता फराजसोबत करीनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि लोक कमेंट करून अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत. नेटकऱ्यांनी करिनासह इतर सर्वच बॉलिवूड कलाकारांचा 'देशद्रोही' असा उल्लेख केला आहे.
"बॉलीवुड वाले तो, हैं ही देशद्रोही"
करिना कपूर आणि फराज मन्नान यांच्या फोटोवर एका युजरनं लिहिलंय की, "हिलाही पाकिस्तानला पाठवा...", तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की, "बॉलीवुड वाले तो हैं ही देशद्रोही, यांना बायकॉट करायला हवं..."
"ही बॉलिवूड सेलिब्रिटी लाज वाटावे असेच..."
एका व्यक्तीनं इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला आणि लिहिलंय की, "हे निर्लज्ज आहेत आणि त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे." दुसऱ्याने कमेंट केली आहे की, "हे बॉलीवूड स्टार्स लाज वाटण्यासारखे आहेत, त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे."
पहलगाम हल्ला पाकिस्तानी कलाकारांसाठी एक संकट
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. यावर कारवाई करत भारतानं पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या 'अबीर गुलाल' या चित्रपटाच्या भारतात प्रदर्शनावरही बंदी घातली आहे. तर हानिया आमिर 'सरदार जी 3' या चित्रपटातून भारतीय चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार होती. मात्र, हल्ल्यानंतर तिला एका रात्रीत रिप्लेस करण्यात आलं .
महत्त्वाच्या इतर बातम्या :