Bengali Actresses Suicide : बंगाली चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्री आणि मॉडेल्स यांच्या आत्महत्येचे सत्र सध्या सुरू आहे. त्यामुळे या चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ माजली आहे. जवळपास 15 दिवसांमध्येच एकूण चार अभिनेत्रींनी आत्महत्या केली आहे. या अभिनेत्रींच्या आत्महत्येमागे नक्की काय कारण आहे? तसेच बंगाली चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्रींच्या आत्महत्येचे प्रमाण सध्या वाढत का आहे? असे अनेक प्रश्न सध्या अनेकांना पडत असतील. या चार अभिनेत्रींच्या आत्महत्येच्या घटनांबाबत जाणून घेऊयात...


पल्लवी डे (Pallavi Day)
बंगाली अभिनेत्री पल्लवी डे हिने 15 मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पल्लवीने वयाच्या विसाव्या वर्षी तिचं जीवन संपवलं आहे. पल्लवीने आत्महत्या केल्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. पल्लवीला घराच्या छताला लटकलेले पाहून तिच्या कुटुंबियांनी तिला रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या संपूर्ण प्रकरणाचा कोलकाता पोलीस तपास घेत आहेत. पल्लवीच्या मृत्यूचा बंगाली मनोरंजनसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. 


बिदिशा डे (Bidisha De) 
बंगाली अभिनेत्री आणि मॉडेल असणाऱ्या बिदिशा डेनं   26 मे रोजी आत्महत्या केली आहे. तिच्या मृत्यूनं अनेकांना धक्का बसला आहे. कोलकाता येथील नगर  बाजारमध्ये बिदिशा ही भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायची आणि तिथेच तिने आत्महत्या केली. बुधवारी संध्याकाळी पोलिसांना बिदिशा डेचा मृतदेह तिच्या फ्लॅटमधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता, तो तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला आणि त्यानंतर बिदिशाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. रिपोर्टनुसार, बिदिशा चार महिन्यांपूर्वीच नागर बाजारमध्ये शिफ्ट झाली होती. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एका रिपोर्टनुसार, बिदिशाच्या घरातून पोलिसांना एक सुसाईड नोट देखील सापडली आहे.


नैराश्याचा समाना करत होती बिदिशा
बिदिशाच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती तिच्या बॉयफ्रेंडमुळे डिप्रेशनमध्ये होती. बिदिशाची जवळची मैत्रीण दिया दास हिने सांगितले की, ती डिप्रेशनमध्ये होती. बिदिशाचा बॉयफ्रेंड अनुभव याच्या आणखी 3 गर्लफ्रेंड्स होत्या. बिदिशा ही त्याला इतर मुलींसोबत शकत नव्हती. या प्रकरणामुळे ती डिप्रेशनमध्ये होती


मंजुषा नियोगी (Manjusha Niyogi)
कोलकातामधील राहत्या घरात अभिनेत्री मंजुषा नियोगीचा मृतदेह 27 मे रोजी आढळला. मंजुषाच्या आईने सांगितलं की, बिदिशाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर मंजुषा ही नैराश्यात गेली.  “माझी मुलगी सतत म्हणायची की तिला बिदिशासोबत रहायचे आहे. बिदिशाबद्दल ती सतत बोलायची.”, असंही मंजुषाच्या आईनं सांगितलं. 


सरस्वती दास (Saraswati Das)
नुकतीच मॉडेल आणि मेक-अप आर्टिस्ट असणाऱ्या सरस्वती दासनं (Saraswati Das) आज (30 मे) आत्महत्या केली आहे. 18 वर्षाच्या सरस्वतीनं पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. ही घटना कोलकाता येथील कस्बामध्ये घडली आहे. रिपोर्टनुसार, रविवारी सरस्वतीनं तिच्या घरातील पंख्ययाला लटकून फाशी घेतली. रात्री दोन वाजता सरस्वतीच्या आजीनं तिला या अवस्थेत पाहिलं. त्यानंतर सरस्वतीला हॉस्पिटमध्ये घेऊन जाण्यात आलं. डॉक्टरनं सरस्वतीला मृत घोषित केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती तिच्या आजीच्या जवळ झोपली होती. पण रात्री दोन वाजता सरस्वती आजीच्या जवळ नव्हती.


सरस्वतीला देखील आले होते नैराश्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती गेल्या 17 वर्षांपासून तिच्या आई आणि मामासोबत राहत होती, कारण तिची आई 17 वर्षांपूर्वी तिच्या पतीपासून विभक्त झाली होती. दहावीनंतर सरस्वतीने शिक्षण सोडले. यानंतर तिने ट्यूशनमध्ये शिकवायला सुरुवात केली. ती मॉडेलिंगमध्ये करिअर करत होती. सरस्वती ही तिच्या रिलेशनशिप्समुळे खूप तणावात होती. यामुळे तिला काही काळ डिप्रेशनचा समाना करावा लागला होता. पोलिसांनी सरस्वतीचा फोन जप्त केला आहे. फोनमधील रेकॉर्ड्स जेव्हा पोलीस तपासत होते तेव्हा असं लक्षात आलं की रात्री एक वाजता सरस्वती ही तिच्या बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलत होती. सरस्वतीचं तिच्या बॉयफ्रेंडसोबत भांडण झालं होतं. त्यानंतर सरस्वतीनं फाशी घेतली.  सध्या पोलीस पोस्टमॉर्टम रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहेत.


हेही वाचा :