Jharkhand Crime : लग्नसमारंभात दुसऱ्या पुरुषासोबत नाचणं एका महिलेला चांगलंच महागात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडमधील चतरा येथे ही घटना घडली आहे. लारकुवा गावात शनिवारी एक लग्नसमारंभ सुरू होता. यावेळी गावातील स्त्री-पुरुष डीजेच्या तालावर नाचण्यात दंग होते. यामध्ये काही पुरुष जोड्याने त्यांच्या पत्नीसोबत डान्स करत होते. याच समारंभात शांती देवी नावाची महिलाही तिचा पती शीतल भारती सोबत नाचत होती. यावेळी शांती देवीचा पती दारूच्या नशेत होता. काही वेळ नाचल्यानंतर शांती देवीचा नवरा थकला. यानंतर त्याने शांती देवीकडे घरी नेण्याचा हट्ट धरला. मात्र नाचण्यात दंग असलेल्या शांती देवीनं घरी जाण्यास नकार दिला. त्यानंतर पती शीतल भारती रागाच्या भरात निघून गेली.


काठीनं बेदम मारहाण
सुमारे दोन तासांनी जेव्हा शांती देवी घरी पोहोचली तेव्हा पती शीतल भारती दरवाजा उघडण्यासाठी आला. त्याने पत्नीला उशीरा घरी येण्याचं कारण विचारलं, तेव्हा महिलेनं ती नाचत होती असं सांगितलं. यानंतर नवऱ्याला राग अनावर झाला आणि त्याने घरातील लाठ्या बाहेर काढल्या आणि पत्नीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पती शीतल भारती रागाने रागाच्या भरात पत्नी शांती देवीला सुमारे 15 मिनिटे बेदम मारहाण केली. या मारहाणीत काही वेळातच पत्नीचा मृत्यू झाला.


आत्महत्या दाखवण्यासाठी मृतदेह लटकवला
पत्नीच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचा छडा लागू नये म्हणून पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाला आत्महत्येचं स्वरूप देण्याच्या प्रयत्न केला. शांती देवीचा पती आणि त्याच्या कुटुंबियांनी महिलेचा मृतदेह फासावर लटकवला.


पोलिसांकडून आरोपीत पतीला अटक
शीतल भारतीच्या कुटुंबियांनी स्वत: पोलिसांना फोन करत शांती देवीनं आत्महत्या केल्याचं सांगितलं. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनंतर मृतदेह तपासणीसाठी नेण्यात आला. यावेळी शांती देवीच्या शरीरावरील जखमांच्या खुणा पाहून महिलेचा खून झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पण शीतल भारतीचे इतर कुटुंबिय फरार आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या