Ram Charan Visits Dargah-Temple: सध्या अभिनेता राम चरण (Ram Charan) त्याच्या आगामी 'गेम चेंजर' (Game Changer) चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान त्याने नुकतीच मंदिर आणि दर्ग्याला भेट दिली. त्याला पाहताच चाहत्यांची गर्दी उसळली आणि गर्दी इतकी वाढली की, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. राम चरणने त्याच्या RC16 चित्रपटाचे दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्यासोबत कडप्पा यांच्यासह आंध्र प्रदेशला भेट दिली. यावेळी तो विजया दुर्गादेवी मंदिरात दर्शनासाठी गेला होता. याशिवाय अमीन पीर दर्ग्यालाही त्याने भेट दिली.                                      


संगीतकार ए आर रहमानची जुनी इच्छा पूर्ण करण्यासाठी राम चरण दर्ग्यात गेला होता. राम चरणी दर्गा आणि मंदिरात दर्शनासाठी पोहचताच चाहत्यांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे रस्तेही ठप्प झाले. राम चरणचे सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ देखील व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय. या व्हिडीओमध्ये त्याच्या  कारच्या सनरूफवरून चाहत्यांना तो त्याची झलक दाखवतोय. हे पाहण्यासाठी राम चरणच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यानंतर या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.                                 










'गेम चेंजर' कधी रिलीज होणार?


राम चरणच्या 'गेम चेंजर' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. राजकीय नाट्यघडामोडींवर हा सिनेमा आधारित आहे. अनेक दिवसांपासून चाहते राम चरणच्या या सिनेमाची वाट पाहताय. येत्या 10 जानेवारी 2025 रोजी 'गेम चेंजर'थिएटरमध्ये दाखल होणार आहे.  






ही बातमी वाचा : 


Madhuri Dixit : करिअरच्या शिखरावर असताना लग्न करुन परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय का घेतला? माधुरी म्हणाली...