Madhuri Dixit : अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही सध्या तिच्या 'भुल भुलैय्या 3' सिनेमामुळे बरीच चर्चेत आहे. 90च्या दशकात माधुरी जेव्हा तिच्या करिअरच्या शिखरावर होती, त्यावेळीच तिने अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे डॉ.श्रीराम नेने यांच्यसोबत लग्न करुन परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेण्यावरही माधुरीने भाष्य केलं आहे.
माधुरीने नुकतीच गलाट्टा इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये करिअरच्या शिखरावर असताना लग्न करुन परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला, त्याविषयी काय वाटतं असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर माधुरीने बोलताना म्हटलं की, मला या निर्णयाचा अजिबात पश्चात्ताप होत नाही. कारण मी माझं स्वप्नच जगत होते.
माधुरीने काय म्हटलं?
माधुरीने म्हटलं की, मी खूप खूष होते, कारण मला इतर गोष्टी फार महत्त्वाच्या नव्हत्या. मला मी जे करत होते ते आवडत होते. मला अभिनय, डान्स आणि माझ्या प्रोफेशनची निगडीत असणाऱ्या बऱ्याच गोष्टी करायला आवडतात. तुम्ही जेव्हा स्टार असता, तेव्हा इतर गोष्टी हा फक्त बोनस म्हणून तुम्ही घ्यायच्या असतात. पण माझ्याबाबतीत मी अशा गोष्टींचा कधीच विचार नाही केला. माझ्यासाठी ते कधीच, बापरे आता मी लोकांपासून लांब जाणार.. मी माझ्या करिअरच्या शिखरावर असताना लग्न करतेय.. मी या गोष्टीचा कधीच विचार केला नव्हता.
पुढे तिने म्हटलं की, मी फक्त एवढाच विचार केला की,मी एका योग्य व्यक्तीशी लग्न करतेय. मी एका योग्य व्यक्तीला भेटले आहे. ही तिच व्यक्ती आहे, जिच्यासोबत मला लग्न करायचं होतं आणि मी त्या व्यक्तीशी लग्न केलं कारण प्रत्येकाचं प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी स्वप्न असतं. माझ्यासाठी ते, स्वत:चं घर असणं, नवरा असणं, कुटुंब असणं आणि मुलं असणं हे आहे.
माधुरीने 1999 मध्ये डॉ.श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केलं. अभिनयातून ब्रेक घेत माधुरी अमेरिकेला गेली आणि जवळपास ती दहा वर्ष अमेरिकेतच होती. माधुरीने 2003 मध्ये अरिनला जन्म दिला आणि 2005 मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाचा रायनचा जन्म झाला.