The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटामुळे सध्या ते चर्चेत आहेत. विवेक हे सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट शेअर करत असतात. नुकताच एक व्हिडीओ विवेक यांनी सोशल मीडियावर शेअर करून मीडियामध्ये त्यांच्या विरोधात हेट कॅम्पेन सुरू आहे, असा आरोप केला.
द कश्मीर फाइल्स या चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी विवेक अग्निहोत्री यांना एका पत्रकार परिषदेमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. ही पत्रकार परिषद पाच मे रोजी Foreign Correspondents Club मध्ये आयोजित करण्यात येणार होती. पण नंतर पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. विवेक अग्निहोत्री यांचा असा आरोप आहे की, पत्रकार परिषदेवर मीडियातील दिग्गजांनी आक्षेप घेतल्यानंतर ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. द कश्मीर फाइल्स विरोधात सुरू असलेले आंदोलन आहे, असं विवेक यांनी सांगितलं. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये विवेक यांनी, FCC वर टीका करत, अमित शहा यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'FCC ला अशी अँटी इंडिया आणि अँटी फ्री प्रॉपर्टी देण्यामागचा हेतू मला जाणून घ्यायचा आहे.'
विवेक अग्निहोत्री यांची पत्रकार परिषद आज (5 मे) दिल्लीमधील जनपथल येथील ले मेरिडियन या हॉटेलमध्ये दुपारी 3.30 वाजता आयोजित केली आहे. विवेक यांनी दिलेल्या माहितीनुसार ही ओपन हाउस पत्रकार परिषद असणार आहे. विवेक यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितलं की तिथे ते अवघड प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. तसेच ट्विटरमध्ये शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी स्वत:चा 'हेट कॅम्पेनचा बळी' असा उल्लेख केला.
हेही वाचा :