Viral video: सध्या एका क्षीण, थकलेला आणि पूर्णपणे वाकलेल्या व्यक्तीची गुहेतून सुटका करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या 24 सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये दोन तरुण एका वयस्कर व्यक्तीला आधार देत असल्याचे दिसतय. कुबड आलेली आणि पांढरी दाढी असणारी ही व्यक्ती 188 वर्ष असल्याचं सांगितलं जातंय! एक्स माध्यमावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओने सर्वांच्याच लक्ष वेधून घेतलंय. हा व्हिडिओ शेअर करत 188 वर्षीय वृद्ध एका गुहेत सापडले आहेत आणि या वृद्ध व्यक्तीचे नाव सियाराम बाबा असा आहे, असं अनेक जण सांगत आहेत. तर हा व्हिडिओ पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचेही अहवाल दुसऱ्या बाजूला येत आहेत.
नक्की काय आहे व्हिडिओत?
एक्स माध्यमावर शेअर करण्यात आलेल्या 24 सेकंदाच्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये कमरेतून वयानं पूर्ण खाली वाकलेल्या एका वृद्धास हाताला धरून नेत असल्याचा हा व्हिडिओ आहे. कन्सर्न सिटीजन या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून खाली हा भारतीय व्यक्ती गुहेत सापडला तर सांगण्यात आलंय . एवढेच नाही तर या व्यक्तीचे वय 188 वर्ष असल्याचा दावाही करण्यात आलाय .
अनेकांनी खोडून काढला दावा?
सध्या सोशल मीडियावर या व्यक्तीविषयी अनेक कंड्या पिकवल्या जात असून हा व्यक्ती हिंदू संत असल्याचं काहींनी सांगायला सुरुवात केली आहे . या वृद्धाच नाव सियाराम बाबा असल्याचं कोणी म्हणतंय तर कोणी हा संत मध्य प्रदेशचा असल्याचा सांगतंय . अनेकांनी या वृद्धाचे वय 110 वर्ष सांगितला असून काही जण तर 188 वर्ष सांगत आहेत . लोकांचे हे दावे अनेकांनी खोडले असून ही माहिती पूर्णपणे दिशाभूल करणारी असल्याचेही अनेकांनी सांगितलं आहे.
वृद्ध व्यक्तीला मदत करणाऱ्यांचा हा व्हिडिओ
डेटा वेरिफिकेशन ग्रुपने हा व्हिडिओ दिशाभूल करणारा असल्याचं म्हटलं आहे. डी इन्टेन्ट डेटा ने एक्स माध्यमावर ही पोस्ट केली असून त्यात त्यांनी असं म्हटलंय , ही व्हिडिओ क्लिप दिशाभूल करणारी आहे . हा व्हिडिओ केवळ एका वृद्ध व्यक्तीला मदत करणाऱ्या काही लोकांनी शेअर केला असून एक माध्यमावरील एका पोस्टमध्ये सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःच्या दाव्यांच्या आधारे व्हिडिओ प्रसारित करण्यात येत असल्याची चेतावणी ही देण्यात आली आहे .
हेही वाचा:
सोशल मिडियावर नं1 पण कामात...या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या बदलीमुळं ठरलाय चर्चेचा विषय