Vicky Kaushal : अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हा लवकरच छावा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामध्ये तो छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार असून अनेकांना त्याच्या या सिनेमाची उत्सुकता लागून राहिलीये. या सिनेमातील त्याचा लूकही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यातच नुकतीच विकीने  छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.


'छावा' हा चित्रपट डॉ. जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकावर आधारित आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात रश्मिका मंदानादेखील (Rashmika Mandanna) झळकणार आहे. लक्ष्मण उतेकर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची पत्नी येसुबाई भोसले यांच्या भूमिकेत रश्मिका मंदाना झळकणार आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. 


विकाने शेअर केली खास पोस्ट


आज म्हणजेच 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने विकीने त्याच्या सोशल मीडिया एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने छत्रपती संभाजी महाराजांचा एक फोटो शेअर केलाय. त्याला कॅप्शन देत त्याने म्हटलं की, 'स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती. महाराजांचा पराक्रम, त्याग आणि राष्ट्रप्रेम आम्हास सदैव प्रेरणादायी आहे. संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त त्रिवार मुजरा. धर्मरक्षक छावा हृदयी जगवावा. जय भवानी जय शिवाजी'


 'छावा : द ग्रेट वॉरियर' (Chhava : The Great Warrior) या सिनेमाचं शुटींग सध्या विकी करतोय. या चित्रपटात तो छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी सेटवरचा एक फोटो लीक झाला होता.  लांबलचक केस, दाढी, कपाळावर टिळा, गळ्यात माळा अशा विकीच्या जबरदस्त लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.


रश्मिकाने नुकतचं 'छावा'मधील आपलं शूटिंग पूर्ण केलं आहे. एक पोस्ट शेअर करत तिने विकी कौशलचं कौतुक केलं होतं. तसेच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचे आभार मानले होते. दिनेश विजान यांच्या मॅडडॉक्स फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती होत आहे. 6 डिसेंबर 2024 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'छावा'सह विकी कौशलचे बॅड न्यूज आणि लव्ह अॅन्ड वॉर हे चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.




ही बातमी वाचा : 


Manoj Bajpayee : जगाचा निरोप घेण्यापूर्वी सुशांतचा इंडस्ट्रीत कोणासोबत झाला होता शेवटचा संवाद? अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला, 'त्याच्याजागी कुणीही असतं तरी...'