S. K. Bhagavan: कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस.के. भगवान (S. K. Bhagavan) यांचे बंगळुरू (Bengaluru) येथे निधन झाले. वयाच्या 89 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी ट्वीट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे. 


कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्वीट शेअर करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, "कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस. के. भगवान यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले. देव त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी मी प्रार्थना करतो."






बसवराज बोम्मई यांनी आणखी एका ट्वीटमध्ये लिहिलं, 'दोराई-भगवान या जोडीने कन्नड चित्रपटसृष्टीला अनेक प्रसिद्ध चित्रपट दिले आहेत. दोराई राज यांच्यासोबत त्यांनी राजकुमार अभिनीत 'कस्तुरी निवास', 'एराडू सोयम', 'बायलू दारी', 'गिरी कान्ये', 'होसा लेकूक' यासारख्या 55 चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ओम शांती.'


 पार्श्वगायक-संगीत निर्माते अनिरुद्ध शास्त्री यांनी देखील ट्वीट शेअर करुन एसके भगवान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, "द लीजेंड!"






एस. के भगवान यांचे चित्रपट


एस. के भगवान यांनी हिरानैया मित्र मंडळीसोबत थिएटर अभिनेता म्हणून सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 1956 मध्ये कनागल प्रभाकर शास्त्री यांचे असिस्टंट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. दोराई राज यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केलं.  दोराई राज आणि एस. के भगवान या जोडीनं एराडू कानासू, गिरी कान्ये, होसाबेलाकू, जीवन चैत्र आणि ओदाहुट्टीदावरू यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले. एस. के भगवान यांच्या निधनानं आता कन्नड मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.


महत्वाच्या इतर बातम्या :  


Nandamuri Taraka Ratna Passes Away : दाक्षिणात्य अभिनेते नंदामुरी तारका रत्न यांचे निधन; 39 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास