Nandamuri Taraka Ratna : दाक्षिणात्य अभिनेते नंदामुरी तारका रत्न (Nandamuri Taraka Ratna) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 39 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. नंदामुरी यांना 27 जानेवारीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
नंदामुरी (Nandamuri Taraka Ratna Passes Away) यांना कुप्पमजवळील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहतेदेखील प्रार्थना करत होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली असून त्यांचे निधन झाले आहे. नंदामुरी तारका रत्न यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या निधनावर चाहत्यांसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकार शोक व्यक्त करत आहेत.
नंदामुरी तारका रत्न एका पक्षाच्या पदयात्रेत सामील झाले होते. त्यावेळी गर्दीदरम्यान त्यांचा श्वास गुदमरला आणि ते बेशुद्ध झाले. दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते कोमामध्ये होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने कुटुंबियांसह अनेक राजकारणी मंडळी त्यांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले होते.
नंदामुरी तारका रत्न यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत राजकारणातदेखील नशिब आजमावलं आहे. दाक्षिणात्य अभिनेता ज्यूनिअर एनटीआरचे ते चुलत भाऊ होते. तसेच आंधप्रदेशचे माजी मुख्यमंत्री नंदामुरी तारका रामाराव यांचे ते नातू होते.
नंदामुरी तारका रत्न यांचा सिनेप्रवास... (Nandamuri Taraka Ratna Movies)
नंदामुरी तारका रत्न यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. नंदामुरी तारका रत्न यांचा यांचा पहिला सिनेमा 'ओकाटो नंबर कुर्राडु' हा आहे. हा सिनेमा 2002 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण ज्यूनिअर एनटीआरच्या तुलनेत नंदामुरी तारका यांना कमी लोकप्रियता मिळाली. आंधप्रदेशचे मुख्यमंत्री वाई.एस. जगन मोहन रेड्डी, तेदेपा प्रमुख एन. चंद्रबाबू नायडू, अभिनेता चिरंजीवी, केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डीसह अनेक कलाकारांसह राजकारणी मंडळींनी नंदामुरी तारका रत्न यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या