Ashok Saraf :  साईदिशा प्रतिष्ठान आणि इंडियाज टॅलेंट सम्मान फाऊंडेशन (आयटीएसएफ) या संस्थेच्यावतीने यंदाचा "नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार"  ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना प्रदान करण्यात आला . अभिनेते सयाजी शिंदे, गायक  शंकर महादेवन, गायिका वैशाली सामंत याना नटसम्राट बालगंधर्व  गौरव पुरस्कार तर गायिका पिहू शर्मा  आणि  गायक अंगद राज यांना नटसम्राट बालगंधर्व रायझिंग स्टार अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


विलेपार्ले येथील एनएमएसआयएस  विद्यापीठाच्या (मिठीबाई कॉलेज)मुकेश पटेल सभागृहात  संपन्न  झालेल्या या शानदार समारंभाप्रसंगी  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सी. पी. राधाकृष्णन राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, गायक सुरेश वाडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बालगंधर्व स्मारक समितीचे संस्थापक- खजिनदार आणि साईदिशा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक  दत्तात्रय बाळकृष्ण माने  व इंडियाज टॅलेंट सम्मान फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून सन 2000 सालापासून सामाजिक, कला क्रिडा आणि सांस्कृतीक क्षेत्रात कार्यरत आहेत.                                       


संस्थेमार्फत सामाजिक, कला-क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय, औ‌द्योगिक, शैक्षणिक, सहकार, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व करु पाहणाऱ्या व्यक्तींना, संस्थांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल विविध पुरस्कार देऊन सन्मानित करून त्यांचा गौरव केला जातो.  संस्थेच्या माध्यमातून  नारायण श्रीपाद राजहंस (बालगंधर्व) यांच्या नावाने नाट्य व चित्रपट सृष्टीत उल्लेखनीय काम केलेल्या जेष्ठ व करू पाहणाऱ्या युवा कलाकारांना "नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार" देऊन सन्मानित करण्यात येते.  


याच सोहळ्यात स्वप्नील बांदोडकर , सतीश प्रजापती (सँडी),  संतोष लिंबोरे, रविकुमार सोलापुरे ,श्रावणी किरण खोत यांना कला रत्न पुरस्कार तर ठाणे पोलीस आयुक्त आयपीएस आशुतोष डुंबरे यांना रणझुंजार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कामगार आणि प्रशासन प्रधान सचिव आयएएस विनिता वैद सिंघल , सारथी इन्स्टिट्युट, पुणे व्यवस्थापकीय संचालक आयएएस अशोक काकडे , अतिरिक्त आयकर आयुक्त आयआरएस सुधाकर शिंदे, नवी मुंबई मनपा सहाय्यक आयुक्त सतीश जाधव यांना  सेवारत्न पुरस्कार,महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष  प्रवीण एस. लुंकड यांना क्रीडा रत्न रतन पुरस्कार प्रदान करण्यात आला.


ही बातमी वाचा : 


Video : अखेर समोर आलंच! अभिषेक-ऐश्वर्याने एकत्रच साजरा केला होता आराध्याचा वाढदिवस, 'त्या' व्हिडीओमुळे चर्चांना पूर्णविराम