Varun Tej Lavanya Tripathi Engagement : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता वरुण तेज (Varun Tej) आणि अभिनेत्री लावण्या त्रिपाठीला (Lavanya Tripathi) या दोघांचा उद्या (9 जून) साखरपुडा पार पडणार आहे, असं म्हटलं जात आहे. सध्या एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो लावण्या आणि वरुण यांच्या साखरपुड्याच्या निमंत्रण पत्रिकेचा आहे. 


एलुरु श्रीनू या नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन  लावण्या आणि वरुण यांच्या साखरपुड्याच्या निमंत्रण पत्रिकेचा  फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोला कॅप्शन देण्यात आलं, 'इट्स ऑफिशिअल, वरुण आणि लावण्याला शुभेच्छा' लावण्या आणि वरुण यांच्या साखरपुड्याच्या निमंत्रण पत्रिकेवर 'दोन ह्रदये, एक प्रेम. मेगा प्रिन्स वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांचे अभिनंदन. दोघांनाही शुभेच्छा. साखरपुडा: 9 जून 2023' असं लिहिलेलं दिसत आहे. या निमंत्रण पत्रिकेच्या व्हायरल फोटोमुळे खरंच उद्या (9 जून) लावण्या आणि वरुण यांचा साखरपुडा पार पडणार आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 






वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांनी  'मिस्टर' आणि 'अंतरिक्षम' या चित्रपटात काम केलं आहे.  रिपोर्टनुसार,  वरुण तेज आणि लावण्या यांची एंगेजमेंट ही वरुणच्या घरी त्याच्या आई-वडील आणि लावण्यच्या आई-वडिलांच्या उपस्थित होणार आहे. 


 वरुण नुकताच इटलीमध्ये सुट्टीला गेला होता. वरुणनं त्याच्या या ट्रीपचे अनेक फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केले होते. तसेच लावण्‍या देखील ट्रीपला गेली होती, असं म्हटलं जात आहे. वरुण आणि लावण्य दोघेही एकत्र ट्रीपला गेले होता का? असा प्रश्न सध्या त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. 


राम चरण, उपासना कोनिडेला, साई धरम तेज, अल्लू सिरीश, सुष्मिता कोनिडेला, श्रीजा कोनिडेला, पवन कल्यान, अल्लू अर्जुन आणि चिरंजीवी हे सेलिब्रिटी लावण्या आणि वरुण यांच्या साखरपुड्याला हजेरी लावणार आहेत, असं म्हटलं जात आहे. 






संबंधित बातम्या


Varun Tej Engagement : वरुण तेजचा 'या' दिवशी गर्लफ्रेंड लावण्या त्रिपाठीसोबत होणार साखरपुडा; राम चरण अन् चिरंजीवीची हजेरी