Varun Tej Lavanya Tripathi Engagement : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता वरुण तेज (Varun Tej) गेल्या काही वर्षांपासून लावण्या त्रिपाठीला (Lavanya Tripathi) डेट करत आहे. आता अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर वरुण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत म्हणजेच लावण्या त्रिपाठीसोबत साखरपुडा करणार आहे. या महिन्यातच त्यांचा साखरपुडा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


वरुण आणि लावण्याचा साखरपुडा कधी होणार? (Varun Tej Lavanya Tripathi Engagement Date)


वरुण आणि लावण्याचा शाही थाटात साखरपुडा होणार आहे. कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत हैदराबादमध्ये त्यांचा साखरपुडा होणार आहे. येत्या 9 जूनला शाही थाटात त्यांचा साखरपुडा पार पडणार आहे. अद्याप दोघांनीही त्यांच्या साखरपुड्याबद्दल भाष्य केलेलं नाही. मीडिया रिपोर्टनुसार, साखरपुड्यानंतर काही दिवसांनी वरुण आणि लावण्या लग्नबंधनात अडकणार आहेत. 






वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी 'मिस्टर' आणि 'अंतरिक्षम' या सिनेमात एकत्र झळकली होती. मीडिया रिपोर्टनुसार, 2017 पासून वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी एकमेकांना डेट करत आहेत. वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीचा मोठा चाहतावर्ग आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आता ते लग्न करणार असल्याने चाहतेदेखील त्यांच्या लग्नासाठी उत्सुक आहेत. 


सेलिब्रिटींच्या उपस्थितीत पार पडणार वरुण आणि लावण्याचा साखरपुडा (Varun Tej Lavanya Tripathi Guest List)


वरुण आणि लावण्याचा साखरपुड्याला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. यात राम चरण, उपासना कोनिडेला, साई धरम तेज, अल्लू सिरीश, सुष्मिता कोनिडेला, श्रीजा कोनिडेला, पवन कल्यान, अल्लू अर्जुन आणि चिरंजीवीचा समावेश आहे. 


वरुण आणि लावण्या सध्या इटलीमध्ये आहेत. दोघेही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत आहेत. आता वरुण आणि लावण्या लवकरच साखरपुड्यासाठी हैदराबादमध्ये येणार आहेत. वरुण हा चिरंजीवीचा भाचा असून नागा बाबू यांचा मुलगा आहे. नागा बाबू अभिनेता आणि निर्माता म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 'मिस्टर और अंतरीक्षम 9000 KMPH' (Mister and Antariksham 9000 KMPH) या सिनेमाच्या सेटवर वरुण आणि लावण्याची पहिली भेट झाली होती. पुढे त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रींचं रुपांतर प्रेमात झालं. 


संबंधित बातम्या


Entertainment News Live Updates 02 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!