Varun Dhawan : प्रसिद्ध अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) हा त्याच्या आगामी प्रदर्शित होणाऱ्या "जुग जुग जिओ" चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकताच पुण्यातील सिजन मॉल या ठिकाणी आला होता. टेनेट मिडियाक्रोपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये वरूण पत्रकारांशी मराठीध्ये भरभरून बोलत होता. यावेळी बोलताना तो म्हणाला की "मी महाराष्ट्रीय असल्याचा मला सार्थ अभिमान आहे". माझे वडील डेव्हिड धवन (David Dhawan) यांनी पुण्यातील एफ टी आय मधून शिक्षण पूर्ण केले. तसेच बदलापूर या माझ्या चित्रपटाचे चित्रिकरण पुण्यातचं झाले. त्यामुळे मला पुण्याविषयी आपुलकी आहे.
वरून धवन पुढे म्हणाला की, मी मराठी चित्रपट आवडीने बघतो. मला ते चित्रपट आवडतात. "जुग जुग जिओ" या चित्रपटात वडील व मुलाच्या हळुवार नात्याची गोष्ट रसिकांना पाहता येणार आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी, अनिल कपूर, नितु कपूर, प्राजक्ता कोळी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
काही दिवसांपूर्वी वरुण धवनच्या वडिलांना म्हणजेच डेव्हिड धवन यांना तब्येत बिघडल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी वरुणनं सांगितलं होतं की, 'वडिलांची तब्येत ठिक नसताना काम करणं कठिण असतं. आता त्यांची प्रकृती ठिक आहे. ते रुग्णालयातून घरी परतले आहेत. '
कोरोनाच्या महामारी नंतर कौटुंबिक चित्रपट "जुगजुग जिओ" प्रदर्शित होत आहे. रसिकांनी तो चित्रपटगृहात जाऊन आवर्जून पहावा. असे आवाहन अभिनेत्री कियारा अडवाणीने केले.
जुग जुग जियो हा चित्रपट 24 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये वरुण सूद देखील काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं आहे. तसेच धर्मा प्रोडक्शन, वायकॉम 18 यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जुग जुग जियो या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या चित्रपटामधील कलाकारांनी सुपरस्टार सिंगर 2 या शोमध्ये देखील हजेरी लावली होती. या चित्रपटामधील गाण्यांना आणि चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अनेक प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
हेही वाचा :