Singer Asha Bhosle On Ashish Shelar: संगीतकार आर. डी. बर्मन (Music Director R. D. Burman) यांची जयंती. याच दिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्र भूषण आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Aasha Bhosale) या आर. डी. बर्मन यांच्या निवासस्थानी अभिवादन करण्यासाठी पोहोचलेल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत सांस्कृतिक कार्यमंत्री अँड आशिष शेलारही (Ashish Shelar) उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. मी फक्त आशिष शेलार यांना ओळखते, इतर कोणत्याही राजकारण्याला मी ओळखत नाही, असं वक्तव्य ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी केलं आहे.
आज सकाळपासूनच राज्याच्या राजकारणात (Maharashtra Political Updates) एका बातमीनं खळबळ उडवलीय. हिंदी भाषेच्या (Hindi Language) सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकाच दिवशी, एकाच मोर्चात सहभागी होणार आहेत. संजय राऊतांनी महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, असं कॅप्शन आणि राज ठाकरे (Raj Thackeray), उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) फोटोसह एक ट्वीट करत याची घोषणा केली. तेव्हापासूनच आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती होणार आणि अवघ्या महाराष्ट्राच्या मनात असलेली बाब म्हणजे, ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं.
मी फक्त आशिष शेलारांना ओळखते, इतर कोणत्याही राजकारण्याला मी ओळखत नाही : आशा भोसले
याच पार्श्वभूमीवर संगीतकार आर. डी. बर्मन यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना माध्यमांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यावर प्रश्न विचारला. त्यावर बोलताना मी फक्त आशिष शेलार यांना ओळखते, इतर कोणत्याही राजकारण्याला मी ओळखत नाही, असं वक्तव्य आशा भोसले यांनी केलं आहे. तसेच, राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य केल्याच्या मुद्द्यावर विचारलं असता राजकारणावर बोलणार नाही, असंही आशा भोसले म्हणाल्या.
आशा भोसले यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबीयांचे संबंध सर्वश्रुत आहेतच. तसेच, ज्येष्ठ गायिका आशा भोसले कित्येकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मंचावर दिसल्यात. काही दिवसांपूर्वी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं राज ठाकरेंनी मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमाला आशा भोसले यांनी हजेरी लावलेली. त्यावेळी भर मंचावरुन आशा भोसले यांनी राज ठाकरेंवर स्तुतीसुमनं उधळलेली आणि राज ठाकरे माझा दोस्त आहे, असं म्हणत त्यांचं तोंड भरुन कौतुकही केलं होतं. पण, त्याच आशा भोसलेंनी आज केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हिंदी सक्तीविरोधातील ठाकरे बंधूंचा मोर्चा एकत्रच
ठाकरे बंधूंचा मोर्चा निघण्यावर शिक्कामोर्तब कसं झालं याची इनसाईड स्टोरी खासदार राऊतांनी आज प्रसारमाध्यमांना सांगितली. काल राज ठाकरेंनी आपल्याला फोन केला असा दावा संजय राऊत यांनी केला. मराठी माणसांचे दोन मोर्चे निघणं योग्य दिसत नाही, असं राज यांनी फोनवर म्हटलं. त्यामुळे एकत्रित मोर्चा काढण्याबाबत दोन्ही बंधूंचं एकमत झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिलीये. तर 10 वाजताची वेळ सोयीची नसल्यानं वेळ आणि ठिकाणाबाबतचा निर्णय दोन्ही पक्ष मिळून ठरवतील, अशी माहिती देखील राऊतांनी दिलीये. मोर्चात कुठलाही झेंडा नसेल तर केवळ अजेंडा असेल, असा दुजोरा संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या भूमिकेला दिलाय.
पाहा व्हिडीओ : मी फक्त आशिष शेलारांना ओळखते, इतर कोणत्याही राजकारण्याला ओळखत नाही : आशा भोसले
महत्त्वाच्या इतर बातम्या :