Nashik Politics : अलीकडेच शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आता नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena Uddhav Thackeray Faction) दुसरा मोठा धक्का बसलाय.  शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे (Vilas Shinde) हे रविवारी शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत आठ माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते व समर्थकही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement


संघटनात्मक बद्दल मध्यंतरीच्या काळात झाले, तेव्हापासून महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा नेते नाराज आहेत, असा गौप्यस्फोट काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांनी केला होता. यानंतर विलास शिंदे हे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. विलास शिंदे यांनी गेल्या काही दिवसांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळेस भेट घेतली होती. आता विलास शिंदे हे ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.


काय म्हणाले विलास शिंदे? 


विलास शिंदे यांनी पक्षात सतत डावललं गेलं, अशी नाराजी व्यक्त केली आहे. "नवीन जिल्हाप्रमुख म्हणून ज्यांना नेमलं, त्यांच्या मागे कार्यकर्ते नाहीत, तरीही त्यांची नियुक्ती करण्यात आली. विधानसभा निवडणुकीसाठीही मला उमेदवारी देण्यात आली नाही. माझी नाराजी मी खासदार संजय राऊत यांच्याकडे व्यक्त केली होती, मात्र त्यानंतर 15 दिवस उलटून गेले तरीही त्यावर काहीच हालचाल झाली नाही, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी जाहीर केली आहे.


ठाकरे गटाला दुसरा धक्का


दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास हजेरी लावली होती. त्याच वेळी शिंदे गटात विलास शिंदे यांच्या संभाव्य प्रवेशाबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता या चर्चांना अधिकृत पुष्टी मिळालेली आहे. नुकताच सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर नाशिकमध्ये महानगर प्रमुख विलास शिंदे हे देखील शिंदे गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे ठाकरे गटासाठी नाशिकमध्ये हा मोठा धक्का मानला जात आहे.   



इतर महत्त्वाच्या बातम्या


Sudhakar Badgujar: सुधाकर बडगुजरांचा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; 'ती' महत्त्वाची संघटना भाजपमध्ये विलीन करणार


Dinkar Patil on Sudhakar Badgujar : भयमुक्त देश भाजपला करायचा होता अन् गुन्हेगारांनाच प्रवेश; बडगुजरांच्या पक्षप्रवेशावर मनसे नेत्याचा हल्लाबोल