Sandip Deshpande: महाराष्ट्रामध्ये सक्तीच्या हिंदीकरणाविरोधात राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकच भूमिका घेत एकत्र मोर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन बंधूंच्या एकत्र येण्यावर अनेक दिवसांची जी मागणी होत होती त्या मागणीला कुठेतरी मूर्त स्वरूप येत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसे युती होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकलं गेलं आहे का? अशी चर्चा रंगली आहे. सक्तीच्या हिंदी कारणाविरोधात शिवसेनेकडून एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आता भाजपकडून सुद्धा आरोपांच्या फैरी केल्या जात आहेत. दरम्यान, भाजपकडून मराठीला अभिजात दर्जा आम्ही दिल्याचे वारंवार सांगितलं जात आहे. भाजपच्या या भूमिकेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. हिंमत असल्यास गुजराती भाषेला अभिजात दर्जा करून दाखवा, असे जाहीर आव्हान संदीप देशपांडे यांनी दिले.
हिंमत असल्यास गुजरातीला अभिजातचा दर्जा द्या
संदीप देशपांडे पुढे म्हणाले की, मराठीला भाषा अभिजीत भाषेत दर्जा देऊन उपकार केल्याचे वाटत असेल, तर मग गुजराती भाषेला तोच दर्जा देऊन दाखवा. मुळात मराठी भाषेला दर्जा मिळाल तो तिच्या वैभवामुळे मिळाला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी साहित्य, ती भाषा समृद्ध असावी असावी लागते. त्या भाषेतील साहित्य समृद्ध असावं लागतं. त्याशिवाय दर्जा मिळत नाही. तुम्ही शक्तीशाली आहात, तर मग गुजरातीला दर्जा करून दाखवा. मोदी असतील किंवा ट्रम्प असतील, गुजरातीला अभिजात दर्जा करून दाखवा.
महाराष्ट्रद्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केलं आहे. त्यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मराठी साठी दोन्हीभाऊ एकत्र येत असतील मराठी मनांसाठी हा अत्यंत आनंददायी क्षण असेल. मराठी माणूस मराठी अस्मितेसाठी एकत्र आल्यावर महाराष्ट्रद्रोह्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही यात कुठलीही शंका नाही. त्यामुळे मोर्चाच्या आधीच सरकारला नमते घ्यावे लागेल.
इतर महत्वाच्या बातम्या