Usha Naik : ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक (Usha Naik) यांनी ‘एक होता विदूषक’, ‘हळदी कुंकू’, ‘राखणदार’ अशा अनेक सिनेमांतून प्रेक्षकांची मने जिंकली. काही दिवसांपूर्वी  नाईक यांना ‘व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यानंतर त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या. 'अल्ट्रा मराठी बझ’ या युट्यूब चॅनेलला त्यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत उषा नाईक (Usha Naik) यांनी खदखद बोलून दाखवली आहे. "मी देशपांडे, कुलकर्णी किंवा जोशी असते तर माझे खूपच कौतुक झाले असते. मला अनेकदा माझ्या आडनावावरून चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका नाकारण्यात आली", असं वक्तव्य उषा नाईक यांनी केलं आहे. 


माझ्या आडनावामुळे मला बऱ्याच ठिकाणी डावलण्यात आले


उषा नाईक (Usha Naik) म्हणाल्या, मी नेहमी स्पष्ट बोलते. मी स्पष्टपणे सांगते की, माझ्या आडनावामुळे मला बऱ्याच ठिकाणी डावलण्यात आले. माझं आडनाव नाईक आहे. मी जर देशपांडे, जोशी किंवा कुलकर्णी असते तर माझं खूप कौतुक झालं असतं. मात्र, माझे कौतुक झाले नाही. माझं आता एक मत बनलय की, या वयात आल्यानंतर स्पष्ट बोलायला पाहिजे. पूर्वी मी स्पष्टपणे बोलत नव्हते. मात्र, आता माझ्याकडे स्पष्ट वक्तेपणा आला आहे, असंही नाईक (Usha Naik) यांनी नमूद केलं. उषा नाईक यांनी युट्यूब चॅनेलशी बोलताना आपल्या कारकिर्दीतील अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या 


मला अनेक पुरस्कार मिळाले, पण मला त्याचे नवलं वाटले नाही


पुढे बोलताना नाईक  (Usha Naik)म्हणाल्या, मला देखावा कसा करायचा? हे माहिती नाही. मी एका छोट्याशा कुटुंबातून आले आहे. मला मी काम केलंय हे दाखवायला आवडत नाही. मला शो ऑफ करायची सवय नाही.  मी अध्यात्मिक आहे, अशा सवयी मला नाहीत. मी अध्यात्मिक वातावरणात वाढले. मला अनेक पुरस्कार मिळाले. पण मला त्याचे नवलं वाटले नाही, असंही नाईक (Usha Naik) यांनी स्पष्ट केले. फक्त चांगलं काम करत राहणं.  चांगलं काम येईल ते स्वीकारणे आणि पुढे जाणे. एवढचं मी शिकत आले. मी माझं काम शेवटच्या क्षणापर्यंत  करत राहणार असेही उषा नाईक (Usha Naik) यांनी सांगितले.


इतर महत्वाच्या बातम्या 


Nana Patekar on Politics : मी कधीही जनतेसमोर उभा राहून मतं मागणार नाही कारण... उमेदवारीवरुनही मोठं वक्तव्य, नाना पाटेकरांनी एका दगडात किती पक्षी मारले?