Urfi Javed : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत असते. अनेक वेळा उर्फीला तिच्या बोल्ड कपड्यांमुळे ट्रोल केले जाते. नुकत्याच एका  सेलिब्रिटी ज्वेलरी डिझायनरनं उर्फीच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे तिला ट्रोल केले. सुझान खानची (Sussanne Khan) बहिण फराह खान अलीनं (Farah Khan Ali) उर्फीच्या ड्रेसिंग स्टाइलवर कमेंट केली. तिच्या या कमेंटवर उर्फीनं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

फराह अलीची कमेंटफराह अलीनं  उर्फीच्या ड्रेसिंग स्टाइलबद्दल कमेंट केली होती. फराह म्हणाली होती, 'माफ करा पण या मुलीच्या कपड्यांबद्दल हिला सगळ्यांनी सांगितलं पाहिजे. लोक तिची चेष्टा करतात. पण तिला वाटतं की लोक तिचं कौतुक करत आहेत. कोणी तरी तिला सत्य सांगा. ' फराहची ही कमेंट पाहिल्यानंतर उर्फी भडकली. उर्फीनं त्यानंतर फराहला सडेतोड उत्तर दिलं आहे.  उर्फीनं दिलं उत्तरउर्फीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून लिहिले, 'फराह मॅम टेस्टफुल ड्रेसिंग काय असतं? प्लिज याचा अर्थ मला सांग. मला माहित आहे की लोकांना माझी ड्रेसिंग स्टाइल आवडत नाही. लोकांना का वाटतं या गोष्टीचा मी विचार करत नाही. तुम्ही जर डिझायनर ड्रेसचा टॅग लावला तर तो ड्रेस टेस्टफुल होतो का? 'पुढे ती म्हणाली, 'लोक तुमच्या कुटुंबाबद्दल बोलतात. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देता का?' स्टार किड्स देखील त्यांच्या ड्रेसिंग सेन्समुळे ट्रोल होतात. त्यांना तुम्ही ड्रेसिंग सेन्स बदलायला सांगता का?'

उर्फीने भैया की दुल्हनिया, मेरी दुर्गा, बेपनाह आणि पंच बीट सीजन 2 या मालिकेमध्ये काम केले. उर्फीच्या  सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिला इंस्टाग्रामवर  1.6 मिलियनपेक्षा जास्त फोलवर्स आहेत. 

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha