February Movie Release: फेब्रुवारी महिना हा चित्रपटप्रेमींसाठी एक रोमांचक प्रवास असणार आहे, कारण या महिन्यात अनेक उत्तम चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. हे चित्रपट विविध शैलींमधील असतील, जे प्रेक्षकांना एका नव्या प्रकारच्या सिनेमॅटिक प्रवासाला घेऊन जातील.
या महिन्यात खऱ्या घटनांवर आधारित रोमान्स, ऐतिहासिक नाटक, थ्रिलर आणि चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहेत. जाणून घेऊयात, फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या प्रमुख चित्रपटांबद्दल...
1. मेरे हसबैंड की बीवी
अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंह यांचा 'मेरे हसबंड की बीवी' हा चित्रपट 21 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक विनोदी नाटक आहे, ज्यामध्ये पती-पत्नीच्या नात्याची गुंतागुंतीची कहाणी रंजक पद्धतीनं सादर करण्यात आली आहे.
2. छावा
विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा 'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विक्की कौशल छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांना भारतीय इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेची ओळख करून देईल.
3. साको 363
28 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणारा 'साको 36' हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे, जो एका बिश्नोई महिलेच्या शौर्याची कहाणी दर्शवितो.
4. लवयापा
जुनैद खान आणि खुशी कपूर यांचा 'लवयापा' हा चित्रपट 7 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रेम आणि प्रेमाची एक वेगळ्या प्रकारची कथा पाहायला मिळेल. दोन्ही कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही सक्रियपणे सहभागी आहेत.
5. बॅडएस रवि कुमार
हिमेश रेशमिया आणि प्रभु देवा यांचा 'बॅड अॅस रवी कुमार' हा चित्रपट देखील 7 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात हिमेशचा जबरदस्त अॅक्शन लूक पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 'लवयापा' सोबत टक्कर देणार आहे, ज्यामुळे दोन्ही चित्रपटांमधील स्पर्धा अत्यंत मनोरंजक होणार आहे.
6. इन गलियों में
जावेद जाफरी, विवान शाह आणि अवंतिका दसानी यांचा 'इन गलियों में' हा चित्रपट 28 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा एक थ्रिलर चित्रपट आहे.