Longest Ultra Violent Revenge Scene: सध्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये (Bollywood Movies) इंटिमेट सीन्स किंवा बोल्ड सीन्स सर्रास पाहायला मिळतात. बोल्डनेसचा भडीमार आणि मसाला असेल तर चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) चालला म्हणूनच समजा. पण एक काळ असा होता, ज्यावेळी निर्माते त्यांचे चित्रपट हिट करण्यासाठी चक्क बलात्काराचे सीन्स चित्रपटात दाखवले जायचे.  2 ते 3 मिनिटांचे हे सीन्स पाहून लोक हादरुन जायचे. या सीन्समधून चित्रपटातील अभिनेत्रीवर होणारी क्रूरता पाहून अनेकजण थक्क व्हायचे. पण, तुम्हाला माहीत आहे का? एक असाही चित्रपट आहे, ज्यामध्ये थोडा थोडका नाहीतर तब्बल 11 मिनिटांचा लांबलचक रेप सीन आहे. 


बॉलिवूडपासून टॉलिवूड आणि हॉलिवूडपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये अनेक रेप सीन्स दाखवले जायचे.  पण आज आम्ही तुम्हाला अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो अनेक वर्षांपूर्वी प्रदर्शित झालाय, पण आजही या चित्रपटाचं नाव जरी कुणी काढलं तरी, ज्यांनी पाहिलाय त्यांच्या अंगावर काटा येतो. या चित्रपटात सर्वात लांबलचक रेप सीन दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात सुमारे 11 मिनिटांचा बलात्काराचा सीन दाखवण्यात आला होता आणि तो पाहिल्यानंतर प्रेक्षकही थक्क झाले आहेत.


खरंतर आपण 'इरव्हर्सिबल' (Irreversible) या फ्रेंच चित्रपटाबद्दल (French Movies) बोलत आहोत. हा चित्रपट 2002 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याचं दिग्दर्शन गॅस्पर नोए यांनी केलं होतं. या चित्रपटात मोनिका बेलुची, अल्बर्ट डुपोंटेल आणि व्हिन्सेंट कॅसल सारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. 97 मिनिटांच्या या चित्रपटात 11 मिनिटांचा हा सीन दाखवण्यात आला होता.  


'इरव्हर्सिबल'मध्ये मोनिका बेलुचीला अतिशय क्रूरपणे वागवलं गेलं आहे. चित्रपट पाहिल्यानंतर तो सीन पाहून फक्त अंगावर काटे येत नाहीत, तर आपण विसरुन जातो की, हा चित्रपट आहे. आपल्याला त्या नायकावर चीड येते. त्याच्या क्रूरतेचा राग येतो. हे दृश्य पाहिल्यानंतर प्रेक्षकही थक्क झाले आणि या चित्रपटातील एका दृश्याने सर्वत्र खळबळ उडाली. एवढंच नाही तर, या दृश्याला विरोधही झाला आणि जेव्हा गोंधळ वाढला तेव्हा हे दृश्य एडिट करण्यात आलं. 



'इरव्हर्सिबल' चित्रपटाचा 11 मिनिटांचा हा सीन आजही युट्यूबवर अपलोड केला जातो. जर आपल्याला या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं असेल तर, ही कथा अलेसीच्या मोनिका बेलुची या पात्राभोवती फिरते. एका रात्री ती सबवेमधून जात असते, आजूबाजूला निरव शांतता असते. रात्रीची उशिराची वेळ असल्यामुळे तिच्या आसपास दूरदूरपर्यंत कोणी नसतं. मग तेवढ्यात एक क्रूर व्यक्ती येते आणि तिच्यावर अमानुष कृत्य करते. दिग्दर्शकांनी ज्या पद्धतीनं हे दृश्य दाखवलं आहे, हे दृश्य अगदी खरंखरं वाटू लागतं. 


पाहा व्हिडीओ : 



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


तलावात सापडलेल्या मुंडक्याभोवती फिरते पटकथा, सुरू होताच 5 मिनिटांत जबरदस्त सस्पेन्स; डोक्याच्या चिंध्या करतो मिस्ट्री फिल्मचा क्लायमॅक्स