Lalit Modi : आयपीएलचा माजी अध्यक्ष ललित मोदीने भारतीय पासपोर्ट सरेंडर केला होता आणि वानुआतू या छोट्या देशाचे नागरिकत्व घेतले होते. मात्र आता वानुआतू पंतप्रधानांनी ललित मोदीला जोरदार झटका दिला आहे. वानुआतुचे पंतप्रधान जोथम नापट यांनी नागरिकत्व आयोगाला ललित मोदीचा पासपोर्ट तात्काळ रद्द करण्यास सांगितले आहे. पंतप्रधान म्हणाले की मी नागरिकत्व आयोगाला ललित मोदीचा वानुआटू पासपोर्ट त्वरित रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.


न्यायिक पुराव्याअभावी ललित मोदीबाबत भारत सरकारने पाठवलेली अलर्ट नोटीस इंटरपोलने दोनदा फेटाळून लावल्याची माहिती गेल्या 24 तासांत मला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की वानुआटू पासपोर्ट धारण करणे हा एक विशेषाधिकार आहे आणि अधिकार नाही. अशा परिस्थितीत याचिकाकर्त्यांनी वैध कारणांसाठीच नागरिकत्व घ्यावे. ललित मोदीने लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात 7 मार्च रोजी पासपोर्ट सरेंडर केला होता. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने ललित मोदीने पासपोर्ट सरेंडर केल्याची पुष्टी केली होती.






वानुआतु कुठे आहे?


वानुआतु दक्षिण प्रशांत महासागरात स्थित आहे. येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी, पर्यटन, मासेमारी आणि परदेशी आर्थिक सेवांवर आधारित आहे. वानुआतुला गुंतवणुकीवर आधारित नागरिकत्व आहे, म्हणजेच येथे गुंतवणूक करून नागरिकत्व मिळवता येते. पासपोर्टची विक्री हा येथील सरकारच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे.


उत्पन्न, संपत्ती किंवा कॉर्पोरेट कर भरावा लागत नाही


एका अहवालानुसार, 2025 पर्यंत वानुआटू पासपोर्ट 113 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशास अनुमती देईल. हेन्ले पासपोर्ट इंडेक्सनुसार, वानुआतुचा पासपोर्ट जगातील (199 देशांपैकी) 51 व्या क्रमांकावर आहे, सौदी अरेबिया (57), चीन (59) आणि इंडोनेशिया (64) वर आहे. भारत 80 व्या स्थानावर आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे वानुआतु हे एक टॅक्स हेवन आहे, जिथे तुम्हाला कोणतेही उत्पन्न, संपत्ती किंवा कॉर्पोरेट कर भरावा लागत नाही. गेल्या दोन वर्षांत 30 श्रीमंत भारतीयांनी इथले नागरिकत्व घेतले असून, इथले नागरिकत्व घेणाऱ्यांमध्ये चीनचे लोक आघाडीवर आहेत.


ललित मोदी 2010 मध्ये ब्रिटनला पळून गेला


आयपीएल सुरू करणारा ललित मोदी 15 वर्षांपूर्वी भारतातून ब्रिटनमध्ये पळून गेला होता. भारत सतत त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे, आणि कायदेशीर लढाई देखील सुरू आहे, परंतु आता त्याने भारतीय नागरिकत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि ज्या देशात त्याने वानुआतूचे नागरिकत्व घेतले आहे, त्या देशाची लोकसंख्या पुद्दुचेरीपेक्षा कमी आहे, ज्यामुळे या प्रकरणात नवीन वळण आले आहे. मात्र, त्याने आपल्यावरील मनी लाँड्रिंग आणि करचुकवेगिरीचे सर्व आरोप फेटाळून लावले.


इतर महत्वाच्या बातम्या