Runway 34 Motion Poster : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अजय देवगण (Ajay Devgn) यांच्या आगामी 'रनवे 34' (Runway 34) सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. तर सिनेमा 29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये अजय देवगणपासून अमिताभ बच्चन पर्यंत सगळेच कलाकार अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. 


'रनवे 34' सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्याशिवाय बोमन इराणी, रकुल प्रीत सिंह आणि अंगिरा धर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.






अजय देवगणनेच 'रनवे 34' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाचे शूटिंग आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे ईदच्या मुहूर्तावर 29 एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बड्या कलाकारांचा बिग बजेट सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 


संबंधित बातम्या


Ashneer Grover : ‘ये सब दोगलापन है!’ म्हणणाऱ्या अश्नीर ग्रोव्हरच्या घरात 10 कोटींचं डायनिंग टेबल! लक्झरी लाईफ पाहिलीत?


Raudra : ‘कोडी सोडवा आणि बक्षिस जिंका’, ‘रौद्र’ चित्रपटासाठी प्रमोशनचा हटके फंडा!


Black Panther Director Arrested : गलतीसे मिस्टेक! बँक दरोड्याच्या आरोपाखाली ‘ब्लॅक पँथर’च्या दिग्दर्शकाला आधी अटक, मग सुटकाही! नेमकं काय झालं?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha