Trisha Krishnan First Post After Thalapathy Vijay Oath Chief Minister: विधानसभा निवडणुकांनंतर (Tamil Nadu Legislative Assembly Election) तामिळनाडूच्या राजकारणात (Tamil Nadu Politics) मोठा उलटफेट पाहायला मिळाला. अभिनय क्षेत्रातली कारकीर्द सोडून राजकारणाची कास धरलेल्या थलपती विजय (Thalapathy Vijay) यांच्या पक्षानं पहिल्याच निवडणुकीत धमाकेदार कामगिरी करत प्रस्थापितांना जोरदार धक्का दिला. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवत थलपती विजय (Tamil Nadu CM Vijay) यांच्या टीव्हीके पक्षानं (TVK Party) सत्ता स्थापन केली आणि थलपती विजय मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले. एकीकडे थलपती विजय यांच्या पक्षाची धुवांधार कामगिरी चर्चेचा विषय ठरली, तर दुसरीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्याही जोरदार चर्चा रंगलेल्या. अशातच थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात अभिनेत्री तृषा कृष्णन (Actress Trisha Krishnan) मिरवताना दिसली आणि जोरदार चर्चांना उधाण आलं.   एकीकडे राजकीय वर्तुळातली धुवांधार कामगिरी आणि दुसरीकडे घटस्फोटाच्या चर्चांमुळे थलपती विजय गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे. अशातच मीडिया रिपोर्टनुसार, थलपती विजय यांच्या पत्नीनं त्यांचे अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध आहेत, असं घटस्फोटासाठी दाखल याचिकेत नमूद केलेलं. पत्नीनं ज्या अभिनेत्रीबाबत म्हटलंय, ती अभिनेत्री म्हणजे, तृषा कृष्णन असल्याचं बोललं जातंय. तसेच, गेल्या काही दिवसांपासून तृषा कृष्णन आणि थलपती विजय बऱ्याचदा एकत्र दिसलेत. तेव्हापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलंय. त्यामुळेच तृषा कृष्णनचं थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात मिरवणं, त्यांच्या आईला आणि बहिणीला मिठी मारणं सर्वांच्या नजरेत भरलं. अशातच शपथविधीसोहळ्यानंतर तृषा कृष्णन हिनं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनंही सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

Continues below advertisement

तृषा कृष्णननं सोशल मीडियावर काय पोस्ट केली? (Trisha Krishnan Social Media Post)

तृषा कृष्णन हिनं इन्स्टाग्रामवर तिची पहिली पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये शपथविधी सोहळ्यातील तिच्या लूकचे फोटो होते. या फोटोंसोबतच, तिनं 'प्रेम' या विषयावर आधारित एक सुंदर कॅप्शन लिहिलं आणि मग काय?आधीपासूनच सुरू असलेल्या चर्चांना उधाण आलं. दरम्यान, रविवारी चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर थलपती विजय यानं तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

तृषा कृष्णन हिची पहिली पोस्ट (Trisha Krishnan First Post After Thalapathy Vijay Oath As CM)

तृषा कृष्णन हिनं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातील तिच्या लूकचे काही फोटो शेअर केले. या सोहळ्यासाठी, तृषा हिनं 'सीफोम ग्रीन' रंगाची साडी आणि त्यावर सोनेरी रंगाचा ब्लाऊज वेअर केला होता. तसेच, तिनं आपल्या केसांचा अंबाडा बांधून त्यावर गजरा माळला होता. अभिनेत्रीच्या या पारंपरिक लूकला तिच्या चाहत्यांकडून भरभरून पसंती मिळाली. पण, सर्वांचं लक्ष वेधलं ते या फोटोंसोबत तृषा कृष्णन हिनं दिलेल्या कॅप्शननं. 

तृषा कृष्णन हिनं इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलेलं की, "प्यार हमेशा बुलंद होता है. मेरे हमेशा से साथ रहे फेवरेट लोगों का शुक्रिया..." यासोबतच तिनं तिच्या स्टायलिंग आणि मेकअप टीमचेही आभार मानले. 

शपथविधी सोहळ्यात तोऱ्यात मिरवली तृषा कृष्णन

विजय थलपती यांनी चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या समारंभादरम्यान, थलपती विजय यांचे आई-वडील, आणि त्यांच्यासोबतच तृषा कृष्णन, या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होण्यासाठी उपस्थित होते. आपला मुलगा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहून दिग्दर्शक एस. ए. चंद्रशेखर यांनी आपला आनंद व्यक्त केला, तर विजयची आई, शोभा चंद्रशेखर यांनी या विशेष दिवसाचा संबंध 'मातृदिना'शी जोडला. याशिवाय, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये तृषा विजयच्या कुटुंबीयांना आत्मियतेनं भेटत असल्याचं दिसतंय. तृषानं विजयची आई आणि बहिणीला अगदी कडकडून मिठीसुद्धा मारल्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

दरम्यान, विजय थलपती आणि तृषा कृष्णन ही तमिळ सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या जोडीनं घिल्ली (Ghilli), थिरुपाची (Thirupaachi), आथी (Aathi), कुरुवी (Kuruvi) आणि लियो (Leo) यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलंय. बऱ्याच काळापासून, सोशल मीडिया आणि इंटरनेटवर तृषा आणि विजय यांची नावं एकमेकांशी जोडली जात आहेत. पण, या अफवांबाबत दोघांपैकी कोणीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विजय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच, एका लग्नसमारंभात ते तृषासोबत दिसून आले, आणि यामुळे त्यांच्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली. विजय यांची पत्नी संगीता हिनं आपल्या पतीवर विवाहबाह्य संबंधांचे आरोप केल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलेलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Tamil Nadu CM Thalapathy Vijay: तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय पहिल्याच भाषणात खोटं बोलले? वर्गमित्राच्या दाव्यानं खळबळ