Tamil Nadu CM Thalapathy Vijay: सध्या तामिळनाडूवर (Tamil Nadu Election 2026) सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. अभिनयातून निवृत्ती घेऊन राजकारणात पदार्पण केलेल्या थलपती विजय (Thalapathy Vijay) यांनी तामिळनाडूच्या राजकारणात (Tamil Nadu Politics) ऐतिहासिक विजय मिळवला. एवढंच काय तर, तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झालेत. सध्या तामिळनाडूमध्ये थलपती सरकार (Thalapathy Sarkar) स्थापन झालं आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर थलपती विजय (Tamil Nadu CM Thalapathy Vijay) यांनी आपल्या पहिल्याच भाषणानं अख्ख्या तामिळनाडूला आपलंस केलं. फक्त तामिळनाडूच नाहीतर अख्खा देश थलपती विजय यांच्या भाषणानं भारावून गेला. जिथे-तिथे फक्त आणि फक्त थलपती विजय यांचीच चर्चा सुरू होती. पण, आता याच आपल्या पहिल्या भाषणामुळे थलपती विजय चर्चेत आले आहेत. त्यांच्या क्लासमेटनं त्यांच्या भाषणावर आक्षेप नोंदवला आहे. 

Continues below advertisement

थलपती विजय (Tamil Nadu CM Vijay) यांनी आपल्या पहिल्याच भाषणानं संपूर्ण देशभरात खळबळ माजवली. विजय यांनी आपल्या भाषणात दावा केलेला की, त्यांचं बालपण गरिबीत गेलं असून, भुकेच्या वेदनांची त्यांना चांगलीच जाणीव आहे. त्यांचे हे शब्द ऐकून अनेकांचे डोळे पाणावले. मात्र, त्यांच्यासोबतच शिक्षण घेतलेल्या 'मनू जोसेफ' (Manu Joseph) यांनी आता याच दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. लेखक आणि स्तंभलेखक (Columnist) असलेल्या जोसेफ यांनी ट्विटरवर ट्वीट करत असं नमूद केलंय की, लोयोला शाळेत तिसऱ्या इयत्तेत असताना विजय हे त्यांचे वर्गमित्र होते.

Continues below advertisement

थलपती यांचे क्लासमेट नेमकं काय म्हणाले? (Thalapathy Vijay Classmate)

ट्विटर केलेल्या ट्वीटमध्ये मनू जोसेफ यांनी लिहिलंय की, "तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून दिलेल्या आपल्या पहिल्या भाषणात, विजय यांनी आपण गरिबीत वाढलो असून भुकेची जाणीव आपल्याला आहे, असं वक्तव्य केलंय. हे पूर्णपणे निरर्थक आहे, कारण लोयोला शाळेत तिसऱ्या इयत्तेत असताना ते माझे वर्गमित्र होते. त्यांचे वडील एक फिल्ममेकर होते, ज्यांनीच आपल्या मुलाला सिनेसृष्टीत करिअर घडवण्याचा मार्ग मोकळा करून दिला होता. बहुतांश फिल्ममेकर्सप्रमाणेच, त्यांच्या वडिलांनाही कदाचित अधूनमधून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला असेल, हे शक्य आहे. पण ही परिस्थिती म्हणजे, तामिळनाडूमध्ये सर्रास आढळणारी 'व्यापक गरिबी' नव्हे. अनेक श्रीमंत घरातील मुलं 'हातात पैसा नसणं' आणि 'गरिबीत जगणं' या दोन गोष्टींची गल्लत करतात. या दोन्ही पूर्णपणे भिन्न वास्तव आहेत."

मनू जोसेफ यांच्या ट्वीटवर आता सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युजरनं लिहिलंय, "सर, तुम्ही तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलत आहात, कृपया तुम्ही स्वतःच्या सुरक्षेचीही काळजी घ्या..." दुसऱ्या एका युजरनं टिका केलीय की, "काही लोकांनी तर असंही ऐकलं आहे की, ते शाळेत जाण्यासाठी 'टाटा सफारी'चा वापर करत असत..." आणखी एका युजरनं लिहिलंय की, "हे दुर्दैवी आहे की, अशा प्रकारचे लबाड लोक आपले नेते बनत आहेत..." दरम्यान, एका युजरनं प्रश्नही उपस्थित केलाय की, "लोयोला स्कूल, 'तिसरी इयत्ता'?? चेन्नईमध्ये या नावाची कोणतीही शाळा अस्तित्वात नाही. तुम्ही नक्की कशाबद्दल बोलत आहात?" दरम्यान, मनू जोसेफ यांनी केलेल्या ट्वीटसंदर्भात थलपती विजय किंवा त्यांच्या टीमपैकी कोणीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया किंवा भाष्य केलेलं नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'