Titeeksha Tawde Siddharth Bodke :  मराठी सिनेसृष्टीमधलं एक नवं जोडपं नुकतच लग्नबंधनात अडकलं आहे. अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde) आणि सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. त्यातच या जोडप्याने त्यांच्या लग्नानंतरच पहिला सण साजरा केला. होळी आणि धुळवड या तितिक्षा आणि सिद्धार्थच्या लग्नानंतरचा पहिला सण आला. त्यानिमित्ताने प्रेमाच्या रंगात रंगत या जोडीने धुळवड साजरी केली. 


तितिक्षाने सोशल मीडिया अकाऊंटवर धुळवड साजरी केल्याचा व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये तितिक्षा आणि सिद्धार्थ दोघेही रंगात न्हाऊन गेल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्या या व्हिडिओवर त्यांच्या कलाकार मंडळींनी कमेंट्स करत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षावर केला. तितिक्षाने हा व्हिडिओ शेअर करत त्याला हटके कॅप्शन देखील दिलंय. तिने म्हटलं की, 'तू माझ्या आयुष्यात खरे रंग भरलेस.'






तितिक्षा आणि सिद्धार्थचा लग्नसोहळा


तितिक्षा आणि सिद्धार्थने त्यांच्या लग्नासाठी पेस्टल करलची निवड केली होती. तितिक्षाने ऑफ व्हाईट आणि गोल्डन किनार असलेली नऊवारी नेसली होती, तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट कलरचा कुर्ता आणि गोल्डन रंगाचं धोतरं घातलं होतं. त्यांच्या लग्नाच्या या लूकने देखील साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ळद, साखरपुडा, संगीत असे सगळे कार्यक्रम पार पडले. त्यानंतर ही जोडी विवाहबंधनात अडकली. 


तितिक्षा आणि सिद्धार्थची लव्हस्टोरी (Titeeksha Tawde Siddharth Bodke Lovestory)


तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके 'तू अशी जवळी रहा' ही मालिका करत होते. या मालिकेच्या सेटवर शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे मालिका संपली पण त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते रिलेशनमध्ये आहेत. अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.


तितीक्षाने सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर सिद्धार्थचा 'श्रीदेवी प्रसन्न' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याआधी तो 'दृश्यम 2' या बॉलिवूडपटात झळकला होता.


ही बातमी वाचा : 


Khatron Ke Khiladi 14: माधुरीच्या 'डान्स दिवाने'ची जागा घेणार 'खतरों के खिलाडी 14'?, जाणून घ्या कधीपासून सुरु होणार रोहित शेट्टीचा शो