Disha-Tiger Breakup : बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री अशी ओळख असणारी दिशा पटानी (Disha patani) आणि अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर नेहमी होत असतात. अनेक वेळा या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. पण चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान किंवा कार्यक्रमांमध्ये दिशा आणि टायगरनं त्यांच्या नात्याबद्दल बोलणं टाळलं. सध्या या दोघांचं ब्रेकअप झालं आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. दोघे जवळपास सहा वर्ष एकमेकांना डेट करत होते. दिशा आणि टायगरच्या ब्रेकअपच्या बातमीनं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
टायगरच्या एका मित्रानं काही दिवसांपूर्वी दोघांच्या ब्रेकअपबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. सध्या टायगर आणि दिशाच्या ब्रेक-अपची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. आता टायगर आणि दिशा यांच्या ब्रेक-अपच्या चर्चेवर जॅकी श्रॉफनं प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीमध्ये जॅकी म्हणाला, 'ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मी अनेक वेळा त्यांना एकत्र बाहेर जातानं पाहिलंय. मी माझ्या मुलाच्या लव्ह-लाईफकडे लक्ष देत नाही. मला त्यांच्या प्रायव्हसीमध्ये यायचं नाही. पण मला वाटतं ते एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रिण आहेत. '
पुढे जॅकी म्हणाला, 'एकत्र राहायचं की नाही हा त्यांचा निर्णय आहे. जशी माझी आणि माझ्या पत्नीची लव्ह स्टोरी आहे, तशीच ती त्यांची देखील स्टोरी आहे. माझी पत्नी आयशा आणि माझे दिशासोबत चांगले संबंध आहेत.'
लवकरच 'गणपत' आणि 'बागी-4 हे टायगरचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तर दिशाचा 'एक व्हिलन रिटर्न्स' हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. दोघांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
हेही वाचा:
- Ek Villan Returns: दिशा पाटणी अन् जॉन अब्राहमची जमली जोडी! ‘एक व्हिलन रिटर्न्स’चं धमाकेदार पोस्टर पाहिलंत का?
- Heropanti 2 : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर टायगर श्रॉफचा 'हीरोपंती 2' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित