Ek Villan Returns Poster : 'एक व्हिलन रिटर्न्स' (Ek Villain Returns)  हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ‘एक व्हिलन’ हा चित्रपट तब्बल 8 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता आणि आता या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच 'एक व्हिलन रिटर्न्स'चे काही पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत.  या पोस्टरमध्ये दिशा पाटणी (Disha Patani) आणि जॉन अब्राहमचा (John Abraham) जबरदस्त लूक दिसला आहे. त्यांचा लूक पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत. यासोबतच आता चित्रपटाचा ट्रेलर आणि रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.


अभिनेत्री दिशा पाटणीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हे पोस्टर शेअर केले आहेत. यासोबतच तिने एक खास कॅप्शन देखील लिहिले आहे. यात तिने म्हटलेय की, 'नायक आणि नायिकेच्या कथा खूप पाहिल्या, आता खलनायकाची कथा जाणून घेण्याची वेळ आली आहे.' यासोबतच चित्रपटाची रिलीज डेट आणि ट्रेलर रिलीज करण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 30 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. तर, चित्रपट 29 जुलै 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.


पाहा पोस्टर :



या चित्रपटाचा पहिला भाग अर्थात ‘एक व्हिलन’ 2014मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका होती. प्रेक्षक आता या चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत.


'एक व्हिलन रिटर्न्स' हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झालेल्या 'एक व्हिलन'चा सिक्वेल आहे. 'एक व्हिलन' चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होते. तर, 'एक व्हिलन रिटर्न्स' सिनेमात जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.


चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर्स


गेल्या दोन दिवसांत या चित्रपटाचे एकूण 7 पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. 'एक व्हिलन रिटर्न्स'च्या चार पोस्टरमध्ये अर्जुन कपूर, तारा सुतारिया, जॉन अब्राहम आणि दिशा पाटणी मास्क घातलेले दिसत आहेत. तर, बाकी पोस्टर्समध्ये दिशा पाटणी- जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया- अर्जुन कपूर या जोड्या दिसत आहेत. या पोस्टर्समुळे प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली असून, चाहत्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.



संबंधित बातम्या


Disha Patani : दिशा पटानीच्या 'एक व्हिलन रिटर्न्स'चे शूटिंग पूर्ण, 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित


Swayamvar Mika Di Vohti : स्वयंवरात सहभागी झालेल्या इच्छुक वधुंमध्ये भांडण; मिका सिंहने घेतली मजा