Chotya Bayochi Motthi Swapna : नव्या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. विविध वाहिन्यांवरील मालिका प्रेक्षक आवडीनं बघतात. आता लवकरच सोनी मराठी या वाहिनीवर एक नवी मालिका प्रदर्शित होणार आहे. या मालिकेचं नाव छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं  (Chotya Bayochi Motthi Swapna) असं आहे. या मालिकेचा प्रोमो सोनी मराठी वाहिनीच्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. 


छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं या मालिकेच्या प्रोमोमध्ये बयो नावाची मुलगी ही सतत पुस्तकं वाचत असते, असं दिसत आहे. सर्व जण बयोला पुस्तक वाचणं सोडून इतर काही तरी करायला सांगतात पण तरी देखील बयो पुस्तक वाचण्यात मग्न असते. बयोच्या दिवसाची सुरुवात ही पुस्तक वाचण्यापासून होते. घरातील लाइट गेली तरी बयो ही मोबाईलच्या लाइटमध्ये अभ्यास करते. या मालिकेचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'इवल्या डोळ्यांना मोठ्या स्वप्नांची ओढ, बयोच्या ध्यासाला पुस्तकांची जोड! नवी मालिका. छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं लवकरच सोनी मराठी वाहिनीवर' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.अभिनेत्री भाग्यश्री लिमयेनं या प्रोमोला कमेंट करुन या मालिकेला शुभेच्छा दिल्या आहेत. आता प्रेक्षक या मालिकेची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


पाहा प्रोमो: 






वीणा जामकरनं  छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं या मालिकेमध्ये बयोच्या आईची भूमिका साकारली आहे. या मालिकेमधील तिचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. लीणानं अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गाभ्रीचा पाऊस, मर्मबंध आणि रमाई या चित्रपटांमधील वीणाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


हेही वाचा: