Vishakha Subhedar:  महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामुळे अभिनेत्री   विशाखा सुभेदारला (Vishakha Subhedar)  विशेष लोकप्रियता मिळाली. विशाखा ही विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. तिचा विनोदी अंदाज प्रेक्षकांची मनं जिंकतो. सध्या ती कुर्रर्रर्रर्र  या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  कुर्रर्रर्रर्र या नाटकाची टीम सध्या या नाटकाचे प्रयोग परदेशात सादर करत आहे. या नाटकाची टीम अमेरीकेला गेली आहे. नुकतीच विशाखानं कुर्रर्रर्रर्र नाटकाच्या टीमचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला तिनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 


कुर्रर्रर्रर्र या नाटकाच्या टीमचे फोटो विशाखानं शेअर केले. या फोटोमध्ये नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर आणि पॅडी कांबळे हे कलाकार विविध कामे करताना दिसत आहेत. नम्रता आणि विशाखा  या फोटोमध्ये कपड्यांना इस्त्री करताना दिसत आहेत. 


कुर्रर्रर्रर्र या नाटकाच्या टीमचे फोटो शेअर करुन विशाखानं पोस्टमध्ये लिहिलं,  'शोसाठी गेलोय. अनेक कामं स्वतः च करावी लागतात. इस्त्री, सेट, प्रॉपर्टी, lights, music, सगळे सगळे स्वतःच.आम्ही सगळेच या जबाबदाऱ्या पेलावतोय. थँक्यू टीम कुर्रर्रर्रर्र , प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पॅडी कांबळे, शशी केरकर, महेश सुभेदार! थोडं दमतोय, झोपेचं खोबरं होतंय. पण परदेशातील आपल्या माणसांची कौतुकाची थाप खुप समाधान मिळवून देते आणि शेवटच्या फोटोमध्ये दर शोला थकलेले आम्ही पुन्हा एकदा सज्ज होतो पुढल्या प्रवासाला.






विशाखानं शेअर केलेल्या सोशल मीडियावरील (Social Media) पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिला इन्स्टाग्रामवर (Instagram) जवळपास 66 हजारपेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात. विशाखा सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो देखील शेअर करत असते.


फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन या कॉमेडी शोमध्ये विशाखानं काम केलं. तसेच विशाखा ही 'शुभविवाह' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मस्त चाललंय आमचं, ये रे ये रे पैसा-2, येड्यांची जत्रा या चित्रपटांमध्ये देखील विशाखानं काम केलं आहे. विशाखाचा कॉमेडी अंदाज नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतो.


महत्वाच्या इतर बातम्या : 


Vishakha Subhedar: "किती मूर्ख होतो आपण..."; महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम विशाखा सुभेदारच्या पोस्टनं वेधलं लक्ष