Vishakha Subhedar Post Viral On Social Media: अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) ही विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. तिचा विनोदी अंदाज प्रेक्षकांची मनं जिंकतो. महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामुळे विशाखाला विशेष लोकप्रियता मिळाली. तिचं कुर्रर्रर्रर्र हे नाटक सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येतंय. तसेच, विशाखा वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये देखील काम करते. विशाखानं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. या व्हिडीओला तिनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
विशाखा सुभेदारची पोस्ट होतेय व्हायरल...
विशाखानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका गाण्यावर लिप्सिंग करताना दिसत आहे. या व्हिडीओला विशाखानं कॅुप्शन दिलं, 'जरुरत, गरज किती खरी किती खोटी? पण तोंडदेखल्या म्हणणं हे कळतच की, आपल्याला उशिरा का होईना. गरज सरो वैद्य मरो अशाच्या समवेत फार काळ राहू नये. आणि नंतर आपलं आपल्याला हसू येतं की, किती मूर्ख होतो आपण.. कोणाच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवला.' विशाखानं व्हिडीओला दिलेल्या या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे. अनेकांनी विशाखाच्या या व्हिडीओला लाईक केलं आहे. या पोस्टमध्ये विशाखानं कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही. त्यामुळे ही पोस्ट विशाखानं कोणासाठी केली आहे? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.
पाहा व्हिडीओ:
फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन या कॉमेडी शोमध्ये विशाखानं काम केलं. तसेच विशाखा ही 'शुभविवाह' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत ती रागिणी आत्या ही भूमिका साकारत आहे. मस्त चाललंय आमचं, ये रे ये रे पैसा-2, येड्यांची जत्रा या चित्रपटांमध्ये देखील विशाखानं काम केलं आहे. विशाखाच्या सोशल मीडियावरील (Social Media) पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. तिला इन्स्टाग्रामवर (Instagram) जवळपास 66 हजारपेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात. विशाखा सोशल मीडियावर विविध लूकमधील फोटो देखील शेअर करत असते. विशाखाच्या आगामी नाटक, चित्रपट आणि मालिकांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
महत्वाच्या इतर बातम्या :
Vishakha Subhedar : ‘शुभविवाह’ मध्ये विशाखा सुभेदार साकारणार रागिणी आत्या