Prashant Damle : मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या प्रशांत दामले (Prashant Damle) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. ते सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना देतात. सध्या प्रशांत दामले यांचे ‘नियम व अटी लागू’  या नाटकाचे प्रयोग विविध ठिकाणी होत आहेत. या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच प्रशांत दामले यांनी ‘नियम व अटी लागू’  या नाटकाच्या  प्रयोगाबाबत एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 


प्रशांत दामले यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअरल केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'कोण म्हणतं नाटकाला गर्दी होत नाही आणि ही गर्दी नाही, ही आहे ‘दाद’ दर्दी रसिकांची… ही आहे शिस्तप्रिय ईचलकरंजीकरांनी लावलेली रांग- महाराष्ट्रभर तुफान चाललेल्या ‘नियम व अटी लागू’ या खुसखूशीत नाटकाच्या तिकिट बुकिंगसाठी'. प्रशांत दामले यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये नाटकाच्या तिकीट काऊंटच्या इथे लोकांनी रांग केलेली दिसत आहे. 


 ‘नियम व अटी लागू’ या नव्या नाटकाचा शुभारंभ शनिवार 18 मार्च रोजी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात झाला. संकर्षण कऱ्हाडे अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद बर्वे यांनी ‘नियम व अटी लागू’  या नाटकामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. या नाटकाची निर्मिती  प्रशांत दामले यांनी केली आहे. या नाटकामध्ये नियम अटींची  कसरत पार पाडताना एका जोडप्याची होणारी तारांबळ दाखवण्यात आली आहे.


नाटकातील नियम व अटींच्या बाबतीत सदैव जागरुक असणारे निर्माते प्रशांत दामले, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि आपल्या खुमासदार लेखणीने नियम व अटींचा लेखाजोगा मांडणारे युवा लेखक संकर्षण कऱ्हाडे यांचे हे नाटक आहे.






प्रशांत दामलेंनी 1983 साली 'टूरटूर' या नाटकाच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यांनी वेगवेगळ्या नाटकांत वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या आणि त्यांच्या रंगभूमीवरील प्रवासाची बस सुसाट सुटली. प्रशांत दामले यांच्या नकळत दिसले सारे, कार्टी काळजात घुसली, संगीत संशयकल्लोळ, साखर खाल्लेला माणूस आणि एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Prashant Damle : प्रशांत दामलेंच्या 'नियम व अटी लागू' नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला प्रेक्षकांचा उदडं प्रतिसाद