Akhil Bhartiya Marathi Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून आता अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. प्रशांत दामले (Prashant Damle) आणि अजित भुरे (Ajit Bhure) यांच्यात अध्यक्षपदासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. 


नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार आणि उदय सामंत यांची युती? 


शरद पवार (Sharad Pawar) नाट्य परिषदेचे विश्वस्त असल्याने मंत्री उदय सामंत (Uday Samant) अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या चर्चेसंदर्भात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणुकीत प्रसाद कांबळी आणि प्रशांत दामले यांचे पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकले होते. एखाद्या राजकीय निवडणुकीला इतकं महत्त्व प्राप्त झालं नसेल तेवढं यंदाच्या मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. 


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत ज्येष्ठ कलाकार प्रशांत दामले यांचे रंगकर्मी नाटक समूह पॅनल विजयी ठरले. पॅनलमधील विजयी  उमेदवारांनी आज मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. त्यांना पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीच्या वेळी मंत्री उदय सामंतदेखील उपस्थित होते. शरद पवार यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 






नाट्य परिषदेच्या निवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याने या निवडणुकाच आहेत की राजकीय आखाडा असा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच आता नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार आणि उदय सामंत यांची युती होणार असल्याचं म्हटलं जात आहे.  नाट्य परिषदेच्या निवडणुकीबद्दल उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाबद्दल दोघांमध्ये चर्चादेखील झाली आहे. 


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात रंगकर्मी नाटक समूहाच्या पॅनलल मुंबईतील 10 पैकी 8 जागा, तर प्रसाद कांबळींच्या 'आपलं पॅनल'ला फक्त 2 जागा मिळाल्या आहेत. 


प्रशांत दामले आणि अजित भुरे यांच्यात अध्यक्षपदासाठी रस्सीखेच


'अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदे'च्या निवडणुकीत प्रशांत दामलेंच्या 'रंगकर्मी नाटक समूहा'ने बाजी मारली आहे. 'रंगकर्मी नाटक समूहात' एका पेक्षा एक दर्जेदार उमेदवारांचा समावेश होता. 'बदल हवा...पॅनल नवा... रंगकर्मींसाठीच हवाच हवा', असं म्हणत रंगकर्मी नाटक समूहाने प्रचार केला होता. वैजयंती आपटे, विजय केंकरे, विजय गोखले, दिलीप जाधव, प्रशांत दामले, अजित भुरे, सविता मालपेकर, सुशांत शेलार, सयाजी शिंदे आणि विजय सूर्यवंशी हे नाट्यकर्मी 'रंगकर्मी नाटक समूहा'चे उमेदवार होते. आता यात प्रशांत दामले आणि अजित भुरे यांच्यात अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. 


संबंधित बातम्या


Akhil Bhartiya Marathi Natya Parishad :  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर; प्रशांत दामले विजयी