Prashant Damle Niyam V Ati Lagu : माणूस हा असा प्राणी आहे की, सामान्यपणे तो कोणत्याही मानवी नियमांत बसत नाही. कालचा माणूस आज वेगळा भासतो. कोणत्या प्रसंगी आपण कसे वागू हे निश्‍चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे सांगणे आणि स्वतः वागणे यात फरक पडतो. थोडक्यात काय तर नियम व अटींच्या (Niyam V Ati Lagu) बाबतीत विचाराच्या, वागण्याच्या बाबतीत ठामच असावे, असा हट्ट अनेकदा चुकीचा ठरतो. सोयीनुसार नियमातून पळवाट काढताना अटींचा भंग होऊ शकतो. हे माहीत असूनही नियम व अटी लागू केल्या जातात. त्यात जर या नियम व अटी नवरा व बायकोच्या नात्याला लागू करायच्या असतील तर काय?  


नियम अटींची ही कसरत पार पाडताना एका जोडप्याची होणारी तारांबळ पाहायची असेल तर निर्माते प्रशांत दामले यांचं भन्नाट नियम व मजेशीर अटींसह रंगभूमीवर आलेलं ‘नियम व अटी लागू’ हे आजच्या पिढीचं खुसखुशीत नाटक नक्की पाहा. गौरी थिएटर निर्मित व प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘नियम व अटी लागू’ या नव्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग नुकताच पार पडला असून या प्रयोगाला नाट्यरसिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.






आयुष्य जगताना नात्यात काही नियम आणि अटी आचरणात आणायला हव्यात : चंद्रकांत कुलकर्णी


‘नियम व अटी लागू’ या आजच्या तरुण पिढीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या नाटकाच्या लेखनाची धुरा संकर्षणने सांभाळली आहे. तर चंद्रकांत कुलकर्णींनी या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत या नाटकाबद्दल बोलताना चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले,"आजच्या व्यावहारिक जगात वावरताना माणसांमधील नाती जपण्यापेक्षा आपण ग्राहक अधिक झालो आहोत. बाहेरच्या जगामध्ये वावरताना आपल्याला अनेक नियम आणि अटी पाळाव्या लागतात, बंधनं पाळावी लागतात. तसंच आयुष्य जगताना नात्यात काही नियम आणि अटी आचरणात आणायला हव्यात. त्या नेमक्या काय असू शकतील? याची खेळकर पद्धतीनं लिहिलेली रोचक अशी ही गोष्ट आहे".


शुभारंभाच्या प्रयोगाला प्रेक्षकांचा उदडं प्रतिसाद


प्रेक्षकांच्या उदडं प्रतिसादात 'नियम व अटी लागू' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडला आहे. प्रशांत दामलेंनी खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. 


संबंधित बातम्या


Entertainment News Live Updates 19 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!