Nadav Lapid Apologies For His Comment: इस्त्रायली फिल्म मेकर आणि गोव्यातील आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2022 (IFFI 2022)चे ज्युरी अध्यक्ष नदाव लॅपिड सध्या ‘द कश्मीर फाईल्स’ सिनेमावरील वक्तव्यामुळं चर्चेत आहेत. आता त्यांनी आपल्या या वक्तव्यामुळं काश्मीरमधील पीडितांच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांची माफी मागतो, असं म्हटलं आहे. माझा उद्देश त्या लोकांचा अपमान करण्याचा आजिबात नव्हता, असंही त्यांनी म्हटलं आहे.
गोव्यात आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (iffi) समारोपाच्या कार्यक्रमात ज्युरी नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होणं ही धक्कादायक बाब असल्याचं म्हटलं होतं. हा चित्रपट वल्गर आणि प्रोपेगेंडा असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. काल नदाव लॅपिड यांनी म्हटलं होतं की, काही लोकांना हा चांगला चित्रपट वाटतो हे मी स्वीकारतो. त्यांच्या या भूमिकेवर अनेकांनी टीका केली होती तर काहींनी या भूमिकेचं स्वागतही केलं होतं.
मला कुणाचाही अपमान करायचा नव्हता
सीएनएन-न्यूज 18सोबत बोलताना नदाव यांनी म्हटलं आहे की, मला कुणाचाही अपमान करायचा नव्हता. माझा उद्देश कधीही पीडित लोकांचा किंवा त्यांच्या नातेवाईकांचा अपमान करण्याचा नव्हता. जर त्यांनी याचा अर्थ तसा लावला असेल तर मी त्यांची माफी मागतो, असं नदाव लॅपिड यांनी म्हटलं आहे.
प्रचार किंवा प्रोपगेंडा म्हणजे काय हे कुणीही ठरवू शकत नाही?
काल इंडिया टुडेशी संवाद साधताना नदाव लॅपिड यांनी म्हटलं होतं की, प्रचार किंवा प्रोपगेंडा म्हणजे काय हे कुणीही ठरवू शकत नाही? हे सत्य मी मान्य करतो. 'द काश्मीर फाइल्स' हा एक जबरदस्त चित्रपट आहे. मी जे केलं ते माझं कर्तव्य होतं. नदाव म्हणाले की, मी जे त्यावेळी बोललो तोच दुसऱ्या ज्यूरींचा देखील अनुभव होता. मात्र त्यांनी यावर भाष्य केलं नाही. काही लोकांना ही ब्रिलियंट फिल्म वाटते हे मी स्वीकारतो, असं नदाव यांनी म्हटलं होतं.
नदावच्या वक्तव्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, अभिनेते अनुपम खेर आणि पल्लवी जोशीसह अनेकांनी नदाववर टीका केली होती. तर ज्युरीमधील सदस्य सुदीप्तो सेन यांनी नदाव यांचं वक्तव्य त्यांचं वैयक्तिक असल्याचं म्हटलं होतं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Nadav Lapid: 'द कश्मीर फाईल्स'ला प्रपोगंडा आणि वल्गर म्हणणारे नदाव लॅपिड आहेत कोण? जाणून घ्या