The Kashmir Files : सध्या 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी केले आहे. 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाबद्दल काही लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. हा चित्रपट काही राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे. चित्रपटाबद्दल नुकताच कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra)नं एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्यानं ट्विटरवर शेअर केला. व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी कुणालला ट्रोल केलं आहे.
कुणालचं ट्वीट
कुणालनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये द कश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री दिसत आहे. एक व्यक्ती विवेक यांनी प्रश्न विचारतो की 'द कश्मीर फाइल्स या चित्रपटाची कमाई तुम्ही दान का नाही करत' यावर विवेक हे उत्तर देतात की, 'जेव्हा हा चित्रपट चांगली कमाई करेल तेव्हा मी याचा विचार करेल.' विवेक यांचा हा व्हिडीओ शेअर करून कुणालनं कॅप्शनमध्ये लिहिले, 'देशासाठी जीव देण्यास तयार आहेत, पैसे द्यायला नाही.'
कुणालला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
कुणालनं विवेक अग्निहोत्री यांचा व्हिडीओ शेअर केल्यानं अनेकांनी कुणालला ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्यानं कुणालचं ट्वीट रिट्वीट करून लिहिले, 'आम्ही कोणत्याही खान आडनाव असणाऱ्या अभिनेत्याला त्याच्या 300 कोटी कमाई करण्याऱ्या चित्रफटाची कामाई दान करताना पाहिलं नाही, मग हे का दान करतील . थोडं लॉजिक वापरा. '
संबंधित बातम्या
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Dasvi Trailer: दसवीचा ट्रेलर पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या महिलेकडून रिक्षा चालकाने भाडं घेतलं नाही, विवेक अग्निहोत्रीने मानले आभार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha