Yogi Adityanath Oath Ceremony : आज उत्तर प्रदेशसाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण, योगी आदित्यनाथ हे आज उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. योगी हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सायंकाळी चा वाजता हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच शपथविधी सोहळ्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी देखील आमंत्रण देण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि मायावती यांना फोन करुन शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. तसेच सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलायम सिंह यादव यांनाही फोन केला आहे.
 
दरम्यान, मागील काही दिवसापूर्वी या शपथविधी सोहळ्याविषयी बोलताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले होते की, मला वाटत नाही की मी शपथविधीला जाईन, कारण मला बोलावले जाणार नाही. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांनी त्यांना फोन करून शपथविधी सोहळ्याला येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे आता अखिलेश यादव या सोहळ्यासाठी जाणार की नाही हे पाहमं महत्त्वाचं ठरणार आहे.


योगी आदित्यनाथ आज सायंकाळी 4 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुख्यमंत्री योगी यांचा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, काल लखनौ येथील लोकभवनात भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत योगी आदित्यनाथ यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. निरीक्षक म्हणून आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या उपस्थितीत योगी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. 


उत्तर प्रदेश विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला 255 जागा मिळाल्या, तर त्यांचा मित्रपक्ष अपना दल सोनेलालने 12 आणि निषाद पक्षाने सहा जागा जिंकल्या. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने 111 जागा जिंकल्या आहेत. सपाचा मित्रपक्ष सुहेलदेव समाज पक्षाने सहा तर राष्ट्रीय लोकदलाने आठ जागा जिंकल्या आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: