The Kashmir Files द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) या चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. काही प्रेक्षक या चित्रपटाच्या पोस्टरचे पेंटिंग साकारून या चित्रपटाचं कौतुक करत आहे. गुजरात(Gujarat) मधील सूरत (Surat) मधील एका साडीचा व्यापार करणाऱ्या व्यक्तीनं नुकतीच 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटातील सिन्सचे फोटो प्रिंट केलेली साडी तयार केली आहे. 


गुजरातमधील सूरत शहराला टेक्सटाइल नगरी म्हटलं जातं. इथे विविध प्रकारच्या प्रिंट असणाऱ्या साड्या तयार करण्यात येतात. सूरतमधील विनोद कुमार सुराना यांनी नुकतीच 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटामधील सिन्सचे फोटो प्रिंट असणारी साडी तयार केली आहे. सूरतमध्ये अभिनंदन टेक्स्टाइल मार्केटमध्ये विनोद कुमार यांचे साडीचे दुकान आहे. द कश्मीर फाइल्स चित्रपटाला प्रेक्षकांची मिळणारी पसंती पाहता विनोद यांनी ही साडी तयार करण्याचा निर्णय घेताला. द कश्मिर फाइल्स चित्रपटाच्या सिन्सची प्रिंट असणाऱ्या अशा तीन प्रकारच्या साड्या विनोद यांनी तयार केल्या आहेत.  



विनोद सुराना यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, द कश्मीर फाइल्स चित्रफट पाहिल्यानंतर त्यांना कश्मीरी पंडितांच्या वेदना जाणवल्या आणि त्यानंतर त्यांनी या चित्रपटाची थिम असणारी साडी तयार करण्याचा प्लॅन तयार केला. ही 6 मीटरची साडी 300 रंगांचा वापर करून तयार करण्यात आली आहे. तसेच ही डिजिटल प्रिंटचा वापर करून तयार करण्यात आली. ज्याप्रमाणे सरकारने चित्रपट करमुक्त केला आहे, त्याचप्रमाणे आम्ही साड्या विना नफा विकणार आहोत, असंही विनोद यांनी सांगितलं. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha