The Kashmir Files : विवेक अग्निहोत्रीचा 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉर्ड बनवत आहे. 6 दिवसात 100 कोटींच्या अगदी जवळ पोहोचलेला हा चित्रपट प्रभासच्या ‘राधे श्याम’ आणि आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’सारख्या मोठ्या चित्रपटांवर भारी पडला आहे. कारण, ‘द कश्मीर फाइल्स’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये लोकांची मोठी गर्दी झाली आहे. ‘द काश्मीर फाइल्स’च्या कमाईचा हा वेग दुसऱ्या आठवड्यातही कायम राहिला, तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी नवे विक्रम स्थापित करेल.


'द कश्मीर फाइल्स' रिलीजच्या 6व्या दिवशी, चित्रपटाने 19.05 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता या चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 79.25 कोटी रुपये आहे. 11 मार्च रोजी रिलीज झालेली ‘द कश्मीर फाइल्स’ 1990च्या कश्मीर बंडखोरी दरम्यान काश्मिरी हिंदूंच्या निर्गमनावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई!


'द कश्मीर फाइल्स' ने 5व्या दिवशी जागतिक बॉक्स ऑफिसवर 18 कोटी रुपयांची कमाई केली आणि सहाव्या दिवशी त्यात प्रचंड वाढ दिसून आली. चित्रपटाने सहाव्या दिवशी 19.05 कोटी रुपयांची कमाई केली आणि जगभरातील एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन सुमारे 79.25 कोटी रुपये झाले. विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटाच्या दुसऱ्या आठवड्यातील कलेक्शन या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.


 





चित्रपटाचा वेग पाहता तो लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल असे वाटते आहे. 18 मार्च रोजी रिलीज होणाऱ्या अक्षय कुमारच्या बच्चन पांडेसोबत, अनुपम खेर स्टारर या चित्रपटाची स्पर्धा पाहणे देखील मनोरंजक ठरणार आहे.


अनेक राज्यांमध्ये चित्रपट करमुक्त!


दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटात काश्मिरी पंडितांवरील अत्याचार अतिशय ठळक पद्धतीने दाखवले आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. देशातील 7 राज्यांनी या चित्रपटाळा करमुक्त घोषित केले आहे. या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, गोवा, त्रिपुरा आणि कर्नाटक यांचा समावेश आहे. काश्मिरी पंडितांवर झालेला अनन्या आणि हल्ल्यांचे विदारक सत्य सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले जात आहे.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha