The Kashmir Files : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)  यांच्या  'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. चित्रपट रिलीज होऊन 31 दिवस झाले परंतू आजही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं 250 कोटींपेक्षा जास्त कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केले आहे. 


ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटानं पाचव्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी 50 लाखांची कमाई केली होती. त्यानंतर शनिवारी या चित्रपटानं 85 लाख रूपये बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं. रविवारी या चित्रपटानं 1.15 कोटींची कमाई केली. या चित्रपटानं आत्तापर्यंत भारतामध्ये 250.73 कोटींची कमाई केली आहे. 'द कश्मीर फाइल्स' या  चित्रपटामध्ये अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती  आणि दर्शन कुमार  या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 






  लवकरच द कश्मीर पाइल्स हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या कथानकाला आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 


हेही वाचा :