Thalapathy Vijays Jana Nayagan Box Office Collection: मुख्यमंत्री थलपती विजय (Thalapathy Vijay) यांचा बहुप्रतिक्षित पॉलिटिकल ड्रामा फिल्म 'जना नायगन'ने (Jana Nayagan)  सुरुवातीला सिनेमागृहात (Box Office Collection) धुमाकूळ घातला होता. हा सिनेमा थलपती विजय यांच्या अॅक्टिंग कारकिर्दीतील शेवटचा सिनेमा असल्याचे म्हटलं जात आहे. हा सिनेमा 23 जुलै रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला होता.  या सिनेमाने सुरुवातीच्या दिवसांत जबरदस्त कमाई केली होती. मात्र, आता या सिनेमाच्या कमाईत घट होत असल्याचं दिसत आहे.  बिग बजेटमध्ये (Entertainment) तयार झालेल्या या सिनेमाने हवी तशी कमाई केलेली नाही.  आता हा सिनेमाने दुसऱ्या आठवड्यात एन्ट्री केली आहे. या सिनेमाने 8 व्या दिवशी किती कोटींचं कलेक्शन केलं? जाणून घेऊयात.

Continues below advertisement

'जना नायगन'ने 8 दिवसांत किती कोटींचं कलेक्शन केलं? (Jana Nayagan 8th Box Office Collection)

प्रदर्शनापूर्वी 'जना नायगन' या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. ओपनिंग डे ला या सिनेमाने जबरदस्त कमाई केली. ही एक पॉलिटिकल अॅक्शन फिल्म आहे. विकेंडला चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. पण विकडेजमध्ये या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.  मिडिया रिपोर्ट्सनुसार, 'जना नायगन' हा सिनेमा 365 ते 500 कोटींमध्ये तयार झाला.   पण आठवडाभरात या सिनेमाने बजेट वसूल कमाई केलेली नाही.

फिल्मच्या कलेक्शनबाबत बोलायचं झाल्यास,  ओपनिंग डेला या सिनेमाने  42 कोटींचे कलेक्शन केले.  यानंतर या सिनेमाने  दुसऱ्या दिवशी  21.15 कोटींचे कलेक्शन केले. तर, तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 28.90 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे.  तर, चौथ्या दिवसाच्या कलेक्शनबाबत बोलायचं झाल्यास,  चौथ्या दिवशी या सिनेमाने  32 कोटींचा गल्ला जमवला.   पाचव्या दिवशी  10.65 कोटी आणि सहाव्या दिवशी 8 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं आहे.  तर, सातव्या दिवशी या सिनेमाने 6.10 कोटी कमावले.

Continues below advertisement

 

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, 'जना नायगन' या सिनेमाने 8 व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या गुरुवारी 3.98 कोटींचं कलेक्शन केलं.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'जना नायगन' या सिनेमाने एकूण 8 दिवसांत 153.48 कोटींचं कलेक्शन केलं आहे. येत्या काळात हा सिनेमा बजेट वसूल करु शकेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

स्टार प्रवाहवरची 'ही' मालिका वर्षभरातच गाशा गुंडाळणार, अभिनेत्री भावूक, सेटवरच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत म्हणाली...