Star Pravah Halad Rusli Kunku Hasla Serial: स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर सध्या कार्यक्रमांच्या वेळापत्रकात आणि मालिकांमध्ये मोठे बदल होताना दिसतायत. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणि टीआरपीच्या (TRP) शर्यतीत टिकून राहण्यासाठी एकामागोमाग एक नव्या मालिकांचा धडाका चॅनलकडून लावण्यात आलाय. अशातच आता 10 ऑगस्टपासून आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'आमच्या लाडक्या नाईक बाई' (Aamchya Ladkya Naik Bai) या मालिकेच स्टार अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Actress Aishwarya Narkar) महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. संध्याकाळी 6.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या मालिकेच्या घोषणेपासूनच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, अशा चर्चा रंगलेल्या, त्या चर्चा अखेर खऱ्या ठरल्यात. नव्या मालिकेच्या आगमनासोबतच वाहिनीवरील एका लोकप्रिय मालिकेचा प्रवासही आता संपणार आहे.

Continues below advertisement

स्टार प्रवाहवर दुपारच्या स्लॉटमध्ये प्रसारित होणारी 'हळद रुसली कुंकू हसलं' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. जवळपास वर्षभर प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर या मालिकेचा शेवट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मालिकेतील मुख्य अभिनेत्रीनं शूटिंग सेटवरील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत मालिकेच्या ऑफएअर होण्याची बातमी चाहत्यांना दिली. आपली लाडकी मालिका निरोप घेणार असल्यामुळे चाहत्यांचा हिरोमोड झालाय. 

Continues below advertisement

'हळद रुसली कुंकू हसलं' मालिका साधारण वर्षभरापूर्वीच सुरू झालेली आणि आता वर्षभरातच ही मालिका आपला गाशा गुंडाळणार आहे. या मालिकेत समृद्धी केळकर मुख्य भूमिकेत होती, आणि तिच्यासोबत अभिषेक रहाळकरनं स्क्रिन शेअर केलेली. कृष्णा आणि दृष्यंत या जोडीनं प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलेलं. पण, आता मालिका निरोप घेत असल्यानं दोघे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. 

समृद्धी केळकरची इन्स्टा पोस्ट 

'हळद रुसली कुंकू हसलं' मालिकेतली मुख्य अभिनेत्री समृद्धी केळकर हिनं तिच्या इन्स्टा हँडलवरुन सेटवरचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तिनं फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "कृष्णा म्हणून शेवटचे काही क्षण... सेटवरची ही शेवटची रात्र, शूटिंग संपलंय मी तुमचा निरोप घेते. माझं मन खरंच खूप भरून आलंय..."

दरम्यान, समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर स्टार 'हळद रुसली कुंकू हसलं' ही मालिका स्टार प्रवाहवर दुपारी 1 वाजता टेलिकास्ट होत होती. आता लवकरच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे मालिकेचा शेवट कसा होईल? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Aamchya Ladkya Naik Bai Marathi Serial Track: भूमिकेसाठी भीतीवर मात… स्टार प्रवाहवरच्या नव्या मालिकेत झळकणार 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली...