Govinda Say No To Tezaab And Anil Kapoor Become Superstar: बॉलिवूडमध्ये (Bollywood news) अनेक सिनेमे (Hindi Movies) रिलीज होतात, काही हिट ठरतात, पण काही कालांतरानं विस्मृतीत जातात. पण, असे काही सिनेमे आहेत, जे अगदी या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत सर्वांच्या काळजात घर करतात. अशा सिनेमांची नाव उच्चारताच त्यातली गाणी, डायलॉग्ज आणि स्टार कास्ट डोळ्यांसमोर जिवंत होते. अनिल कपूर (Anil Kapoor) यांची मुख्य भूमिका असलेला आणि जवळपास 38 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला असाच एक सिनेमा म्हणजे, 'तेजाब' (Tezaab), ज्यानं प्रेक्षकांना अक्षरशः भूरळ घातलेली. बॉक्स ऑफिसवर (Box Offic Collection) प्रेक्षकांची गर्दी कमी होण्याचं नाव घेतच नव्हती आणि हा सिनेमा थिएटर्समध्ये सलग 50 आठवडे चालला. तरीही, या ब्लॉकबस्टर सिनेमाशी संबंधित एक असं गुपित आहे, ज्याबद्दल आजही फार कमी लोकांना माहीत आहे. या सिनेमातील एक अत्यंत महत्त्वाची भूमिका सुरुवातीला सुपरस्टार गोविंदा यांना देऊ केली होती. पण, त्यानं ती नाकारली आणि हेच नेमकं अनिल कपूर यांच्या पथ्यावर पडलं आणि त्यांना बनवलं इंडस्ट्रीचा सुपरस्टार.
जेव्हा 'या' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला... (Tezaab Box Office Collection)
1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तेजाब'नं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवलं. त्यावेळी सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागत असत आणि या सिनेमाची क्रेझ अनेक महिने थिएटर्समध्ये कायम होती. त्यावर्षी प्रदर्शित झालेल्या इतर अनेक मोठ्या सिनेमांच्या तुलनेत या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर अधिक कमाई केली. अनिल कपूर यांची 'अँग्री यंग मॅन' ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली, तर या सिनेमाच्या यशानंतर माधुरी दीक्षित घराघरांत पोहोचली. 'एक दो तीन' हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की, आजही पार्ट्या आणि स्टेज शोमध्ये ते आवर्जून वाजवलं जातं.
गोविंदानं संधी गमावली, चंकी पांडेनं मारली बाजी (Govinda Say No To Tezaab)
'तेजाब'मध्ये चंकी पांडेनं 'बब्बन'ची भूमिका साकारली होती, पण सुरुवातीला ही भूमिका गोविंदाला देऊ केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, गोविंदाला ज्यावेळी 'तेजाब' सिनेमाची ऑफर देण्यात आलेली, त्यावेळी गोविंदा इतर प्रोजेक्ट्समध्ये खूपच बिझी होता. आधीपासूनच दिलेल्या कमिटमेंट्समुळे त्याच्यासाठी 'तेजाब'ची भूमिका स्विकारणं फारच अवघड होतं. त्यामुळे त्यानं या भूमिकेला नकार दिला. त्यानंतर ही भूमिका चंकी पांडेकडे आली आणि त्यानं आपल्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही जेव्हा 'तेजाब'ची चर्चा होते, तेव्हा चंकी पांडेनं साकारलेल्या या भूमिकेची आवर्जून आठवण काढली जाते. ही भूमिका मूळतः दुसऱ्या अभिनेत्यासाठी होती, यावर अनेकांचा आजही विश्वास बसत नाही.
लोक आजही 'तेजाब' आवडीनं पाहतात... (Bollywood Movie Tezaab)
एन. चंद्रा दिग्दर्शित 'तेजाब'मध्ये अनिल कपूर, माधुरी दीक्षित, चंकी पांडे, अनुपम खेर, किरण कुमार, मंदाकिनी, अरुणा इराणी आणि अन्नू कपूर यांसारख्या अनेक कलाकारांची फौज होती. रोमान्स, प्रेम, बदला, इमोशन्स आणि अप्रतिम गाण्यांनी नटलेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. टीव्हीवर हा सिनेमा लागल्यावर लोक तो पाहण्याची संधी कधीच सोडत नाहीत आणि या सिनेमाची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. म्हणूनच, प्रदर्शित होऊन इतकी वर्षे उलटूनही 'तेजाब'ची गणना बॉलिवूडमधील कल्ट सिनेमांमध्ये केली जाते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
