Terence Lewis, Nora Fatehi : कोरिओग्राफर, डान्सर टेरेंस लुईस  (Terence Lewis) आणि अभिनेत्री  नोरा फतेही (Nora Fatehi) या दोघांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. टेरेंस आणि नोरा यांनी इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 2 (India's Best Dancer) चे परिक्षण केले आहे. या शोमधील दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. शोमधील दोघांच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे नोरा आणि टेरेंस हे एकमेकांना डेट करत आहेत,अशी चर्चा सुरू होती. त्याबाबत आता टेरेंसनं माहिती दिली आहे. 


सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये टेसेंसनं सांगितलं की, त्याची आणि नोराची केमिस्ट्री चांगली आहे. पुढे तो म्हणाला, 'मी तिला डेट करत नाहीये. लोक अफवा पसरवत आहेत. नोरा खूप चांगली आहे. आमच्यामध्ये मैत्री आहे.'


टेरेंसला मुलाखतीमध्ये विचारण्यात आले की, तु आणि नोरा एकमेकांना डेट करत आहात का? त्यावर टेरेंसनं हसत उत्तर दिलं, 'हे गुपित आहे. मी तुला याबाबत ऑफ कॅमेरा सांगेन.'


टेरेंस सध्या डान्स दीवाने ज्युनियर या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तर  दिलबर दिलबर, हाय गरमी या गाण्यांमधील नृत्यामुळे नोराला विशेष लोकप्रियता मिळाली. झलक दिखला जा ,बिग बॉस-9, कॉमेडी नाइट्स बचाओ ,डान्स प्लस 4 या शोमधून नोरा प्रेक्षकांच्या भेटीस आली. 'रोअर: टायगर्स ऑफ सुंदरबन' या चित्रपटातून नोराने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.  


हेही वाचा :